मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या कारणांनी सतत वादात राहणारी ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या वैयक्तिक वैवाहिक जीवनातील उलथापालथीने चर्चेत आली आहे. तिच्या गंभीर आरोपांसह केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आदिल खान दुर्रानीला अटक केली आहे. तो तुरुंगात असतानाच राखीने पुन्हा धक्कादायक आरोप केला आहे. आदिलने माझे न्यूड व्हीडिओ तयार करून लोकांना विकल्याचे तिचे म्हणणे असून या आरोपाने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.
राखीने एका मुलाखतीत सांगितले की, आदिलने न्यूड व्हिडीओ बनवून लोकांना विकले. सायबर क्राइम विभाग चौकशी करीत आहेत. तो तिसऱ्यांदा त्याची गर्लफ्रेंड तनूसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे. न्यायालयात बाजू मांडण्याकाठी आलेल्या राखीने प्रसार माध्यमांसमोर सांगितले की, आदिलला जामीन मिळालेला नाही. माझी मेडिकल टेस्ट झाली असून त्याचे पुरावेही मी पोलीस ठाण्यात सादर केले आहेत.
आदिलने पैसेही चोरल्याचाही आरोप
राखीने आरोप केला की, आदिलने छळ करून माझी फसवणूक केली आहे. आदिलने माझा ओटीपी घेऊन बँक खात्यातून पैसे चोरले. दागिनेही त्याने चोरले आहेत. राखीच्या वकिलांनीसुद्धा आमच्याकडे सर्व पुरावे असून आदिलला जामीन मिळणार नसल्याचे सांगितले. दीड कोटींची फसवणूक हा मोठा गुन्हा असून या प्रकरणाची न्यायालयातही चर्चा व्हावी, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली.
आईच्या मृत्यूसाठीही तोच जबाबदार
राखीने तिच्या आईच्या मृत्यूसाठी आदिलला जबाबदार धरले आहे. मराठी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी तिने आदिलला दहा लाखांचा चेक दिला होता, तिच्या आईवर शस्त्रक्रिया करावी लागली. पण, आदिलने ते पैसे आपल्या आईवर उपचारासाठी खर्च केले नाहीत, त्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचे तिचे म्हणणे आहे.
व्हिडिओही आला समोर
राखीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती आदिलकडे पैसे मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक हैराण आहेत. ‘तू माझ्याकडून घेतलेले दीड कोटी रुपये कधी देणार आहेस’, अशी विचारणा ती करताना दिसते. त्यावर आदिलने ‘चार महिन्यात आणि तेही नफ्यासह देतो‘ असे तो सांगतो. त्यावर राखी तिला नफा नको, फक्त हक्काचा पैसा हवा असल्याचे सांगते आहे.
https://twitter.com/viralbhayani77/status/1624005909516279809?s=20&t=6-U8joNzZm5N3co4Jx2FPw
Actress Rakhi Sawant Allegation Nude Video Sale