मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात घडणार्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. परंतु तिला अनेक चित्रपटांची ऑफर आली होती. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे ती ते चित्रपट करू शकली नाही. आज आपण तिने नाकारलेल्या अशा चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्याने तिला एकदाही पश्चाताप झाला नाही.
प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याच्या गजनी या चित्रपटात काम करण्याची ऑफर प्रियंका चोप्राला मिळाली होती. परंतु त्यादरम्यान प्रियंकाच्या खात्यात अनेक चित्रपट होते. त्यामुळे तिने गजनीची ऑफर नाकारावी लागली होती. दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या हिरोइन या चित्रपटाची ऑफरही प्रियंकाने नाकारली होती. हा चित्रपट फॅशन चित्रपटासारखाच असू शकतो असे प्रियंकाला वाटले होते. तिला अशी भूमिका पुन्हा साकारायची नव्हती.
मैं और मिसेस खन्ना या चित्रपटाची कथासुद्धा प्रियंका चोप्राला आवडली नव्हती. या चित्रपटात नंतर करिना कपूरने काम केले होते. प्रियंकाने फन्ने खाँ या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर चित्रपटात काम करण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले होते. नंतर या चित्रपटाची ऑफर ऐश्वर्या रॉय बच्चनने स्वीकारली होती. हा चित्रपट तिकीट बारीवर कोसळला होता. अभिनेत्री आलिया भट्टच्या आधी २ स्टेट्स चित्रपटाची ऑफर प्रियंका चोप्रालाच मिळाली होती. व्यग्र कार्यक्रमांमुळे तिने हा चित्रपट नाकारला होता.
दिनेश विजन यांच्या कॉकटेल चित्रपटासाठी सर्वात प्रथम प्रियंकाशी संपर्क साधण्यात आला होता. या चित्रपटात प्रियंकाला वेरोनिकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आवडेल का नाही याबद्दल प्रियंका साशंक होती. नंतर या चित्रपटामुळे दीपिका पदुकोणचे करिअर रुळावर आले होते. सलमान खानच्या किक या चित्रपटाची ऑफर प्रियंका चोप्राने नाकारली होती. तारखा जुळत नसल्याने प्रियंकाने काम करण्याची इच्छा असतानाही हा चित्रपट नाकारला होता.
सुपरस्टार रजनिकांत यांच्या रोबोट चित्रपटात प्रियंकाला ऑफर देण्यात आली होती. परंतु व्यग्र कार्यक्रमांमुळे ती हा चित्रपट स्वीकारू शकली नाही. सलमान खानच्या सुलतान या प्रसिद्ध चित्रपटातही प्रियंकाला ऑफर देण्यात आली होती. परंतु काही मिनिटातच तिने हा चित्रपट नाकारला होता. नंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने या संधीचे सोने केले होते. रेस २ या चित्रपटासाठी प्रियंकाला विचारण्यात आले होते. परंतु वेळ नसल्यामुळे तिने चित्रपट नाकारला होता.