मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा ही वयाच्या ४६व्या वर्षी आई झाली आहे. मातृसुख तिला मिळाल्याने ती प्रचंड आनंदी आहे. तिने स्वतःच ही सुखद बातमी चाहत्यांसह सर्वांना कळविली आहे. प्रितीने तिचा पती जीन गुडइनफ याच्यासमवेत एक फोटो सोशल मिडियामध्ये शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, मला ही वार्ता सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आमच्या घरी आज जुळे आले आहेत. त्यांचे नाव जय झिंटा आणि जिया झिंटा असे ठेवण्यात आले आहे. म्हणजेच प्रितीला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. या दोघांच्या येण्याने त्यांचे घर भरुन गेले आहे. सुरक्षित प्रसुती झाल्याने तिने डॉक्टर, नर्स, कुटुंबिय व देवाचे आभार मानले आहेत. आमच्या आयुष्यातील नव्या पर्वाला आता आरंभ झाल्याचे तिने म्हटले आहे.
https://twitter.com/realpreityzinta/status/1461207950232416258