सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री आणि खासदार नूसरत जहाँला न्यायालयाचा दिलासा; दिला हा निकाल

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 1:29 pm
in राष्ट्रीय
0
FEamkX6UUAE CCx

कोलकाता – बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नूसरत जहाँ आणि निखिल जैन यांचे लग्न भारतीय कायद्यानुसार वैध नव्हते या खासदार नुसरत जहाँ यांच्या दाव्यावर कोलकाताच्या अलिपूरच्या न्यायालयाने मोहोर उमटवली आहे. नुसरतपासून विभक्त होण्यासाठी निखिल जैन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. हे लग्न कायदेशीररित्या अधिकृत नसल्याने त्यावर वेगळा आदेश देण्याची काहीच गरज नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

निखिल यांच्यापासून विभक्त राहत असलेल्या नुसरत जहाँ यांचे आणि निखिल यांच्याशी झालेले लग्न तुर्कीमधील कायद्यानुसार झाले, भारतीय कायद्यानुसार झाले नव्हते, असे नूसरत जहाँ पूर्वीपासूनच सांगत आल्या आहेत. निखिल जैन यांनी पैसे हडपल्यासह अनेक गंभीर आरोप नूसरत यांनी लावले आहेत. नूसरत ह्या निखिलकडून खर्चासाठी पैसे घेत होत्या, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता. निखिल यांनी नूसरत यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांचा वापर करण्यासह त्यांना न सांगता बँक खात्यांशी छेडछाड केल्याचे आरोप नूसरत यांनी केले होते.

नूसरत यांनी लिहिले होते की, ज्याने स्वतः श्रीमंत असल्याचा दावा केला होता आणि आरोप लावला होता की, मी त्याचा वापर केला. त्यानेच आम्ही विभक्त झाल्यानंतर माझ्या बँक खात्यातून बेकायदेशीररित्या रात्री पैसे काढले. परंतु नुसरत यांच्या आरोपांना निखिल यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून फेटाळले होते. ते म्हणाले होते, की ज्या दिवशी मला हे कळाले की, नूसरत माझ्यासोबत राहू इच्छित नाही. ती दुसऱ्या कोणासोबत राहू इच्छिते. भविष्यात नूसरतसोबत कोणतेही संबंध ठेवण्याची इच्छा नाही.

निखिल जैन म्हणाले होते, की प्रेमात पडून त्यांनी नूसरतसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांनी स्वखुशीने तो स्वीकारला होता. त्यानंतर जून २०१९ मध्ये त्यांनी तुर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. कोलकातामध्ये परतल्यानंतर रिसेप्शन ठेवण्यात आले होते. नूसरत म्हणाल्या होत्या की, त्यांच्या लग्नाला भारतीय कायद्यानुसार मान्यता नाही. त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. नूसरत यांचे अभिनेते यश दासगुप्ता यांच्यासोबत संबंध असल्याचे वृत्त आहे. निखिल यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर नूसरत यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता यश हेच या मुलाचे वडील असल्याचे नूसरत यांनी अप्रत्यक्षरित्या म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री प्रिती झिंटा ४६व्या वर्षी बनली आई; जुळ्यांनी घर दणाणले

Next Post

थेट त्वचेशी संपर्क नसतानाही मानला जाईल लैंगिक छळ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Next Post
SC2B1

थेट त्वचेशी संपर्क नसतानाही मानला जाईल लैंगिक छळ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011