मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो असलेल्या ‘खतरो के खिलाडी’चे नवीन सत्र लवकरच येत आहे. या सत्राचे शुटिंग सुरू झाले आहे. शुटिंगदरम्यान अभिनेत्री नायरा बॅनर्जी हीला दुखापत झाली असून यामुळे खतरो के खिलाडीच्या क्रुमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खतरों के खिलाडी’चं तेरावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. नुकतंच या पर्वाचं शूटिंग सुरू झालं. या पर्वाचं शूटिंग साउथ आफ्रिकेत होत आहे. यामध्ये हिंदी टेलिव्हिजनमधील अनेक आघाडीचे कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. आता अभिनेत्री नायरा बॅनर्जीही यात सहभागी झाली आहे. शुटिंग सुरू होऊन काही दिवस होत नाही तोच तिला गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत सांगताना नायरा म्हणाली,‘आम्ही एका स्टंटचं शूटिंग करत होतो. त्या स्टंटमध्ये आमच्या अंगावर किडे सोडण्यात आले होते. माझ्या संपूर्ण शरीरावर किडे चढले आणि मला चावले. त्या किड्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना गंभीर दुखापत केली आहे. पण आता त्या जखमा बऱ्या होत आहेत. हा टास्क माझ्यासाठी एखाद्या भीतिदायक स्वप्नापेक्षा कमी नव्हता.’
चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
प्रायव्हेट पार्टबद्दल नायराने केलेले वक्तव्य सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहे. तिच्या या वक्तव्यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असतानाच तिच्या चाहत्यांनी मात्र तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
Actress Nyrraa Banerji Injured South Africa Shooting