इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अलीकडच्या काळात चित्रपटांमध्ये चुंबन दृश्ये काही नवीन नाहीत. वेबसिरीजमध्ये तर इतका मोकळेपणा असतो की कदाचित बघणाऱ्यालाच डोळे मिटावेसे वाटतील. छोट्या पडद्यावर अजून याचे इतके लोण आलेले नाही. नुकत्याच एका वेबसिरीजचा सिक्वेल आला आहे. या वेबसिरीजच्या प्रमोशनवेळी एक अभिनेत्री चर्चेत आली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे नीना गुप्ता. कोणतीही भूमिका असो अगदी लीलया पार पाडणाऱ्या नीना गुप्ता यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने एकदा किसिंग सीन्स झाल्यानंतर चक्क डेटॉलने चूळ भरली होती.
काय होता प्रसंग?
लस्ट स्टोरी २’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी या प्रसंगाबद्दल सांगितले. नीना सांगतात, ओठांवर किस करायचा माझा पहिलाच अनुभव अत्यंत वाईट होता. या प्रसंगाचा नीना यांच्या मनावर इतका परिणाम झाला होता की चित्रीकरणानंतर त्यांनी चक्क डेटॉलने चूळ भरली होती. १९९० च्या सुरुवातीला त्या ‘दिल्लगी’ या शोमध्ये काम करत असतानाची ही घटना आहे. हा किसिंग सीन झाल्यानंतर मी रात्रभर झोपू शकले नव्हते. मला फार अस्वस्थ वाट होते, असेही त्या सांगतात. “माझा पहिला किसींग सीन अभिनेता दिलीप धवनसोबत केला होता. इंडियन टेलिव्हिजनवरील इतिहासात तो पहिला ऑन कॅमेरा किसिंग सीन असल्याची जाहिरात त्यांनी केली होती. खरं तर ज्यांच्यासोबत असा सीन करायचा त्याच्यासोबत मी फार कम्फर्टेबल नव्हते, तर आमची केवळ तोंड ओळख होती. ते दिसायला सुंदर होते. पण, माझ्यासाठी कम्फर्ट झोन जास्त महत्त्वाचा होता. मी खूप चिंतेत होते, पण अखेर मी स्वत:ला समजावलं की मला हे करायचंच आहे.” म्हणूनच हा सीन झाल्यानंतर मी डेटॉलने गुळण्या केल्या.
“काही जण टेलिव्हिजनसमोर कॉमेडी करू शकत नाही, काहींना रडता, रडवता येत नाही. ही देखील अशीच गोष्ट आहे. त्या व्यक्तीला मी व्यवस्थित ओळखत नाही, त्याला किस करताना माझ्यासाठी खूप कठीण होतं.”
सिक्वेलमध्ये काय?
नीना गुप्ता आपल्या बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जातात. सध्या त्यांच्या ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉगमुळे नीना गुप्ता चर्चेत आल्या आहेत. ‘गाडी चालविण्यापुर्वी आपण सगळे टेस्ट ड्रायव्हिंग करतोच ना, मग लग्नापुर्वी का नाही?’ असा प्रश्न नीना गुप्ता एका सीनमध्ये अगदी आत्मविश्वासानं विचारताना दिसतात. हा प्रश्न ऐकून त्याच सीनमध्ये एक माणूस नीना गुप्तांच्या या संवादाला प्रत्युत्तर देताना दिसतो आणि म्हणतो की, ‘म्हणजे तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे की प्रत्येकासोबत रात्र… श्शी.’ यावर नीना गुप्ता म्हणतात, ‘काय श्शी!’ सध्या हा डायलॉग चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. या सिरिजबद्दलही जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाबद्दलही लोकांमध्ये उत्सुकता आहे. पाच वर्षांनंतर या चित्रपटाचा पुढचा भाग येतो आहे.
आधी ‘पंचायत’ वेबसीरिजमुळे तर आता ‘लस्ट स्टोरी २’ मुळे नीना गुप्ता कमालीच्या चर्चेत आल्या आहेत. नीना या एक अशा अभिनेत्री आहेत ज्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिल्या आहेत. ‘लस्ट स्टोरी २’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल देवगण, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा आहेत.