इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीत सध्या कोणाचे ना कोणाचे शुभमंगल सुरू आहे. त्यापाठोपाठ आता बॉलीवूडमध्ये देखील एक शाही लग्नसोहळा रंगणार आहे. बॉलीवूडमधील आणखी एक हॉट कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा काही दिवसांपासून सोशल मीडयावर सातत्याने चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा काही काळापासून सुरू आहेत. नव्या वर्षात हे दोघं लग्न करू शकतात अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. यानंतर आता कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचं ठिकाण आणि तारीख याबाबत माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ आणि कियारा राजस्थानच्या जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये सप्तपदी घेणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू होत्या. यानंतर या दोघांनी असं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांसमोर दिलं होतं. मात्र आता एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. कियारा – सिद्धार्थच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही ६ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाच्या आधीचे मेहंदी, हळद, संगीत यांसारखे कार्यक्रम आणि विधी ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहेत. या कार्यक्रमांना कियारा आणि सिद्धार्थचे नातेवाईक तसेच जवळचा मित्रपरिवार उपस्थित असणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा राजस्थानच्या जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये सप्तपदी घेणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.
https://twitter.com/advani_kiara/status/1600032124475564032?s=20&t=Wdw1PryQMqUoY5RFvq20Wg
दरम्यान, सिद्धार्थ आणि कियारा यांपैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सध्या हे दोघंही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दुबईत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
Actress Kiara Advani and Siddhartha Malhotra Wedding
Bollywood Couple