India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मुंबईच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; बघा, कुठली कामे होणार?

India Darpan by India Darpan
January 3, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील लोकहिताची विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते. या योजना यशस्वीपणे विहित मुदतीत कार्यरत व्हाव्यात यासाठी संबंधित विभागांनी व यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी व मुंबई शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असावे, असे आवाहन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ चा आढावा घेण्यात येऊन लोकहिताच्या विविध कामांना निधी मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने पोलीस वसाहतीसाठी शासनाने मान्यता दिलेल्या ३१.५० कोटींच्या निधीतून वाडी बंदर पोलीस वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६.१९ कोटी रुपये, शिवडी पोलीस वसाहतीसाठी ४.९९ कोटी, ताडदेव पोलीस वसाहतीसाठी २.४६ कोटी, बॉडीगार्ड पोलीस वसाहतीसाठी २.५० कोटी, भायखळा पोलीस वसाहतीसाठी २.६० कोटी, काळाचौकी पोलीस वसाहतीसाठी ५.१० कोटी तर डोंगरी पोलीस वसाहतीसाठी १.९२ कोटी असे एकूण २५.७६ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून या निधी अंतर्गत तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

शासकीय रुग्णालयांना यंत्र सामग्री व इतर सुविधा
या योजनेअंतर्गत जे. जे. हॉस्पिटलला कॅथलॅबसाठी ५.७८ कोटी रूपये, गोकुळदास तेजपाल रूग्णालयाला एमआरआय, एक्स-रे मशीन व सिटीस्कॅन मशीनसाठी १३.५७ कोटी, कामा व अल्ब्लेस रूग्णालय येथे आयव्हीएफ केंद्रासाठी ४.६३ कोटी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला डेंटल व्हॅन व यंत्रसामग्री साठी २.०४ कोटी तर सेंट जॉर्ज रुग्णालयाला यंत्रसामग्री व औषधीसाठी ४.१५ कोटी असा एकूण ३५.९५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. म.आ. पोद्दार रुग्णालय येथील केंद्रीयकृत रोग निदान प्रयोगशाळेची स्थापना करणे तसेच रक्त तपासणी प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी एक कोटी व बांधकामासाठी २.८२ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमधील बॅडमिंटन कोर्ट, जिम्नॅशियम हॉल व व्यायाम शाळा, आर्ट गॅलरी, लायब्ररी, ओपन बाल्कनी, स्टोअर रूम, स्विमिंग पूल, चेंजिंग रूम या बाबी अद्ययावत तयार करण्यासाठी ३.८५ कोटी रुपयांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला.

नागरी दलितेतर पायाभूत सुविधांसाठी ९६.११ कोटी, अंगणवाडी येथील सोयी सुविधा अंतर्गत २० अंगणवाड्या स्मार्ट करणे व ८० अंगणवाड्यांना जादुई किलबिल खुर्ची उपलब्ध करून देण्यासाठी २.४८ कोटी, महिला व बाल सशक्तीकरण योजनेअंतर्गत उमरखाडी येथील बालसुधारगृहात नुतनीकरणासाठी ४.७० कोटी तसेच डेव्हिड ससून येथील बालसुधारगृहास ३.३१ कोटी रूपये मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला.

किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी २.५० कोटींच्या निधीस मंजुरी देऊन १.५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तर राज्य ग्रंथालय एशियाटिक लायब्ररीच्या नुतनीकरणासाठी ४० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मत्स्य विकास कार्यक्रमअंतर्गत सागरी मच्छीमारांना शीतपेटीसाठी ३४ लक्ष तसेच माहीम नाखवा मच्छीमार सहकारी संस्था, माहीम कोळीवाडा येथे जेट्टीचा प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी २.३१ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

शासकीय महाविद्यालयांचा विकास या योजनेअंतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालयासाठी २.६३ कोटी, शासकीय विज्ञान संस्थेसाठी २.७८ कोटी, न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेसाठी ४४ लक्ष, सिडनहॅम व्यावसायिक उद्योग शिक्षण व संशोधन संस्थेसाठी ४७ लक्ष, सिडेनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयासाठी २० लक्ष, राज्य प्रशासकीय संस्थेसाठी २९ लक्ष तर शासकीय अध्यापक महाविद्यालयासाठी ३५ लक्ष असा एकूण ७.१४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये यंत्रसामग्री पुरवणे व आधुनिकीकरण करणे यासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉप इमारतीसाठी ७८ लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

Mumbai Development Work Fund Sanction DPC Meet


Previous Post

झोमॅटोचे सहसंस्थापक गुंजन पाटीदार यांचा राजीनामा

Next Post

अखेर ठरलं! बॉलीवूडमधील आणखी एक जोडी अडकणार लग्नबंधनात

Next Post

अखेर ठरलं! बॉलीवूडमधील आणखी एक जोडी अडकणार लग्नबंधनात

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group