इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी बॉलिवूड स्टार कंगना राणौतच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. ठाकूर यांनी कंगना राणौतची मनालीतील सिमसा येथील घरी भेट घेतली. यादरम्यान मुख्यमंत्री ठाकूर आणि शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी कंगनाच्या घरी नाश्ता केला. निवडणुकीपूर्वी कंगना आणि ठाकूरांच्या भेटीबाबत सोशल मीडियावर सट्ट्याचा बाजार सुरू आहे. कंगनाची राजकारणात लवकरच एण्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे.
अभिनेत्री कंगना रणौतनेही या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोसह कॅप्शनमध्ये कंगना म्हणते की, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची घरी भेट झाली. त्यांचा साधेपणा आणि हिमाचलबद्दलचे प्रेम या दोन्ही गोष्टी प्रेरणादायी आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी आईने बब्रू आणि भले यांचा नाश्ता बनवला होता, जो त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वीकारला. कंगनाने सांगितले की ठाकूर हे तिचे शेजारी आहेत, तरीही आज इतक्या वर्षांनंतर तिला भेटण्याचे सौभाग्य मिळाले.
दुसरीकडे कंगना रणौत आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. हिमाचल निवडणुकीच्या प्रचारात कंगनाला उतरवण्याची तयारी सुरू आहे. अर्ध्या तासाहून अधिक काळ दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले की, मी अभिनेत्री कंगनाच्या घरी तिच्या आमंत्रणावरूनच गेलो होतो. त्यांनी अनेकदा निमंत्रण दिले होते. अभिनेत्री कंगना निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर कंगनाच्या चाहत्यांनी या भेटीबाबत अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. नंदनी कौल नावाच्या युजरने लिहिले की, येत्या काही वर्षांत आम्ही तुम्हाला राजकारणाच्या क्षेत्रात नक्कीच पाहू. पण कृपया हे काम अर्धवेळ काम म्हणून करू नका. ग्लॅमरचे हे जग सोडून मनापासून राजकारण करणाऱ्या इतर स्टार्सकडून तुम्ही प्रेरणा घेऊ शकता.
https://twitter.com/jairamthakurbjp/status/1579735295385571329?s=20&t=zypOjOm3vQnCRltwf1zE0g
Actress Kangana Ranaut Soon Join Politics
Entertainment Bollywood CM Jairam Thakur