शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणखी अडचणीत; या प्रकरणात ईडीने बनविले आरोपी

ऑगस्ट 17, 2022 | 12:39 pm
in मनोरंजन
0
Jacqueline Fernandez

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही पुरती अडकली असल्याचे समोर आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिनला थेट आरोपी केले आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या २१५ कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जॅकलिन पूर्णपणे फसली आहे. ईडीने जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची पूर्ण तयारी केली आहे. सुकेश चंद्रशेखर गुन्हेगार असल्याचे जॅकलीनला माहीत होते आणि वसुलीत तिचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे सुकेशकडून वसूल करण्यात आलेल्या पैशांचा फायदा जॅकलिनलाही झाल्याचे ईडीने म्हटले आहे.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनची याआधीही अनेक वेळा चौकशी झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, सुकेशने जॅकलिनला सुमारे १० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जॅकलिनची ७ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. सुकेशने जॅकलिनलाच नव्हे तर तिच्या कुटुंबीयांनाही मौल्यवान भेटवस्तू दिल्याचे तपासात समोर आले आहे.

त्याचबरोबर सुकेशवर वेगवेगळ्या राज्यात जवळपास ३२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध सीबीआय, ईडी आणि आयकर तपास सुरू आहेत. सुकेश चंद्रशेखरवर प्रभावशाली असल्याचे भासवून लोकांना फसवल्याचा आरोप आहे. मोठमोठ्या व्यक्तींसोबत फोटो दाखवून तो लोकांना फसवायचा आणि त्यांच्या कामासाठी मोठमोठे पैसे घेत असे. त्याचप्रमाणे त्याने दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २१५ कोटी रुपये वसूल केले होते आणि ओळखीच्या आधारे पतीला जामीन मिळवून देऊ असे सांगितले होते.

सुकेश तुरुंगातूनच फसवणुकीचे रॅकेट चालवत होता. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन फर्नांडिसचे अनेक खासगी फोटोही लीक झाले आहेत. सुकेशला जाळ्यात अडकवल्यानंतर सुकेशने जॅकलीनलाही फसवून आपल्या जाळ्यात अडकवल्याचे उघड झाले आहे. तो जेलमधून जॅकलिनला भेटवस्तू पाठवायचा आणि बोलायचा.

Actress Jacqueline Fernandez ED Charge sheet

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

Next Post

उद्योजक मधुकर ब्राह्मणकर यांच्या जीवन कार्यावरील ‘दीपस्तंभ’ पुस्तकाचे प्रकाशन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
st bus
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

ऑक्टोबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 2, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
Next Post
DSC 7931 scaled e1660722534489

उद्योजक मधुकर ब्राह्मणकर यांच्या जीवन कार्यावरील ‘दीपस्तंभ’ पुस्तकाचे प्रकाशन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011