मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘ससुराल सिमर का’ या टीव्ही शोमध्ये सिमरची भूमिका साकारून ठसा उमटवणारी अभिनेत्री दीपिका कक्कर लवकरच आई होणार आहे. दीपिका प्रेग्नेंसीच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आहे. जेव्हापासून दीपिकाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली तेव्हापासून ती तिच्या चाहत्यांशी संबंधित प्रत्येक लहान तपशील शेअर करत आहे. दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून खाण्याच्या लालसेपासून फिटनेस रूटीनपर्यंतच्या गोष्टी शेअर करत असते. तिला गर्भावस्थेतील मधुमेह असल्याची माहिती तिने स्वतःच दिली आहे.
दीपिकाने तिच्या यूट्यूब व्लॉग ‘दीपिका की दुनिया’च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दीपिका कक्करने सांगितले की तिला गर्भावस्थेतील मधुमेह आहे. यात घाबरण्याचे काहीच नाही, असेही तिनी स्पष्ट केले. हे सहसा गर्भवती महिलांमध्ये हे आढळून येते. मात्र डॉक्टरांनी त्याला अधिक टाळण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे
दीपिका कक्कर म्हणाली की, गर्भावस्थेतील मधुमेह हा केवळ गोड खाल्ल्याने होत नाही, असे म्हटले जाते की जेव्हा तुमचे बाळ मोठे होते आणि प्लेसेंटामुळे हे शक्य होते. अभिनेत्रीने सांगितले की, डॉक्टरांनी तिला मिठाई खाण्यास मनाई केली आहे. तांदूळ, खजूर, बेकरीचे पदार्थ टाळा असेही सांगण्यात आले आहे. याशिवाय अधिक चालणे आणि व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अभिनेत्रीने सांगितले की, ती रोज एक तास चालायची पण आता गर्भधारणेचा मधुमेह असल्याने रात्रीच्या जेवणानंतरही चालणार आहे. गरोदरपणातील मधुमेहामध्ये गर्भवती महिलेच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. निष्काळजीपणाने वागल्यास त्याचा परिणाम मुलावरही होतो, असे तज्ज्ञ सांगतात.
Actress Dipika Kakar Suffering Disease in Pregnancy