इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर सक्रिय असते. न पटलेल्या विषयांवर ती नेहमीच आवाज उठवते. आता ‘द केरळ स्टोरी’चा चित्रपटाच्या वादासंबंधी अभिनेत्रीने आपला अनुभव सांगितलं आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ॉ
धर्मांतराद्वारे काही महिलांना मुसलमान करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले, त्यांची कथा या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. या चित्रपटावरून वाद सुरू आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाबद्दल लोक आपली वेगवेगळी मते मांडत आहेत. आता देवोलिना भट्टाचार्जीनेही या चित्रपटावर आपले मत मांडले आहे. तिचा नवरा मुस्लीम असल्याचं सांगत या सिनेमात काहीही आक्षेपार्ह वाटलं नसल्याचं तिचं म्हणणं आहे.
देवोलिनाचा अनुभव काय सांगतो?
डिसेंबर २०२२ मध्ये देवोलिनाने जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत कोर्ट मॅरेज केले होते. आंतरधर्मीय विवाहामुळे दोघांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अनेकवेळा तिच्यावर वेगवेगळ्या कारणांमुळे टीकाही झाली पण अभिनेत्रीने सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले. आता अभिनेत्रीनेही ‘द केरला स्टोरी’बद्दल ट्विट केले आहे. युजरच्या ट्विटला रिट्विट करत त्याला उत्तर दिले आणि पतीसह चित्रपटाचे कौतुक केले. एका मुलीने तिच्या मैत्रिणीला ‘द केरला स्टोरी’वरून आलेल्या तिच्या बॉयफ्रेंडचा वाईट अनुभव ट्विटरवर शेअर केला. ते ट्वीट शेअर करत देवोलिनाने लिहिलं, “नेहमीच असं नसतं. माझा नवरा मुस्लिम आहे. तो माझ्याबरोबर हा चित्रपट पाहायला आला होता आणि त्याला हा चित्रपट आवडला. तो हा चित्रपट पाहून नाराज झाला नाही किंवा हा चित्रपट धर्माच्या विरुद्ध आहे असं त्याला वाटलं नाही. प्रत्येक भारतीयाने असं असलं पाहिजे असं मला वाटतं.”
देवोलिनाचे ट्विट चर्चेत
देवोलिनाच्या या म्हणण्यावर नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. काहींनी देवोलिनाच्या या ट्वीटचं कौतुक केलं, तर काहींनी यावरून तिला ट्रोलही केलं. तिचं हे ट्वीट आता खूप व्हायरल होत आहे. या ट्विटवर काहींनी म्हटले की हे आपण ५ वर्षांनी बोलू कारण तुमच्यासोबतही असेच होणार आहे.
Actress Devoleena bhattacharjee the kerala Story