इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिंदी मालिकांमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री छवी मित्तल हिने नुकतीच एका मोठ्या आजारावर मात केली आहे. छवी काही काळापूर्वी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती, ज्याबद्दल तिने तिच्या चाहत्यांना प्रत्येक अपडेट देखील दिले होते. अलीकडेच तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. छवीने केलेल्या या पोस्टमध्ये तिच्या ब्रेस्ट कॅन्सरच्या शस्त्रक्रियेच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.
छवी मित्तलने व्हाईट बिकिनीमध्ये आपला बॅकसाईड फोटो शेअर केला आहे ज्यात ती स्माईल करत पोझ देते आहे. तिच्या पाठच्या बाजूला तिनं एक टॅटूही काढला आहे. या फोटोत ती खूप आनंदी दिसते आहे. तिनं आपल्या इन्टाग्राम अकांऊटवर हा फोटो शेअर करत लिहिले की, या वर्षात मी हे कमावलं आहे. एक नवीन आयुष्य, जे अत्यंत सुंदर आणि कणखर आहे. तिच्या चाहत्यांनीही तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्यावर छवीनेही रिप्लाय दिला आहे. एका कमेंटमध्ये ती म्हणते की, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल तसेच तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद!
व्यायाम करत असताना छवीच्या छातीला दुखापत झाली होती. यावर उपचार घेताना एप्रिलमध्ये छवीला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. आता तिने या आजारावर मात केली आहे तब्बल ६ तास तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर आता ती आपल्या रिकव्हरीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली की, माझ्या आजाराच्या रिकव्हरीचे फोटो मी सोशल मीडियावर शेअर करते आहे. याला खूप धाडस लागते. कारण कर्करोग झाल्यानंतरचे आयुष्य कसे असते, हे मला कोणीच सांगितले नाही. या परिस्थितीला कसं तोंड द्यावं याचीही मला कल्पना नव्हती. सगळ्यांनीच मला वेगवेगळ्या थेरपींबद्दल सांगितलं. पण मी जे अनुभवते ते खूप वेगळे आहे. माझ्या डॉक्टरला देखील मी याबाबत सातत्याने विचारत असते. माझे आयुष्य हे ट्रीटमेंटनंतरही चांगलंच आहे. त्यात काहीच गंभीर नाही. हा आजार गंभीर आहे पण वेळीच निदान झालं तर तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडू शकता.
https://twitter.com/chhavihussein/status/1476390385236594692?s=20&t=ds3qCmrClGdeN_yDABwE9Q
Actress Chhavi Mittal on Breast Cancer Surgery Experience