इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री अनुष्का शर्मा हि आपल्या वैवाहिक आयुष्यात रमली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे एक गोंडस आणि आनंदी जोडपे म्हणून ओळखले जाते. विराट आपल्या खेळाकडे लक्ष देत असताना अनुष्कासाठी वेळ देताना दिसतो. मात्र दुसरीकडे अनुष्का मात्र मनोरंजन विश्वापासून दूर असलेली असते. ती त्या दोघांबद्दल काहीतरी अपडेट सोशल मीडियावर सातत्याने देत असते. दरम्यान अनुष्का सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिने चक्क विक्रीकर विभागाविरोधात याचिका दाखल केली आहे.
अनुष्का शर्माला विक्रीकर विभागाने २०१२ – १३ साली नोटीस बजावली होती. या नोटीसच्या विरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याआधी तिने तिच्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने ती याचिका मागे घेऊन मागच्या आठवड्यात तिने नवी याचिका दाखल केली आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हायकोर्टाने तिच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.
एक पुरस्कार सोहळ्यात निवेदन, सादरीकरण तसेच उत्पादनांची केलेली जाहिरातबाजी तसेच कॉपीराइट कायदयाचे उल्लंघन केले असा ठपका तिच्यावर लावण्यात आला होता. तसेच २०१२- १३ सालात तिने कर भरला नसल्याने थकबाकी वसूल करण्याची नोटीस तिला पाठवण्यात आली. तिने दाखल केलेल्या याचिकेवर विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत ६ फेब्रुवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. अनुष्का सध्या ‘छकडा एक्सप्रेस’ या बायोपिकवर काम करत आहे. यामध्ये अनुष्का महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Here's a glimpse into the Chakda 'Xpress journey with our earnest director @prositroy?#ChakdaXpress #ComingSoon #ChakdaXpressOnNetflix #HarDinFilmyOnNetflix pic.twitter.com/W4AmuseFWS
— Anushka Sharma (@AnushkaSharma) August 29, 2022
Actress Anushka Sharma High Court Sales Tax Notice