मुंबई – टीव्हीच्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह सोहळा अतिशय राजेशाही थाटात संपन्न झाला आहे. हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकाच्या प्रेमात होते. तसेच, ते केव्हा लग्न करणार अशी अटकळ बांधली जात होती. अखेर या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
येथील एका आलिशान हॉटेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. येथील सजावटीसह अनेक बाबी राजेशाही थाटातल्या होत्या. विवाह समारंभाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. फिल्मी स्टाईल पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. बघा, या सोहळ्याची झलक दाखविणारा हा खालील व्हिडिओ
अंकिता आणि विकी हे विन्टेज कारने सोहळ्यात दाखल झाले. विकीचा शानदार शेरवानी आणि अंकिताचा अप्रतिम लेहेंगा या सोहळ्याचे विशेष आकर्षण होता. बॉलिवूडमधील अनेक मान्यवर या सोहळ्याचे साक्षीदार झाले. दोन्ही कुटुंबिय अतिशय खुष आहेत. विकी आणि अंकिताने आपल्या मनासारखा हा सोहळा संपन्न केला आहे. बघा, या सोहळ्याचा आणखी एक व्हिडिओ