इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडिया रातोरात कोणाला प्रसिद्धीच्या झोतात नेईल याचा काही नेम नाही. अंजली अरोरा देखील अशीच प्रसिद्धीच्या झोतात आली. ‘कच्चा बदाम’ या गाण्यावरील डान्समुळे अंजली अरोरा हे नाव सर्वांना चांगलेच परिचित झाले. कंगना राणावतच्या ‘लॉक अप’ या रिऍलिटी शो मध्ये सहभागी झालेली सेलिब्रिटी अंजली अरोरा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अंजलीचा एखादा व्हिडीओ आला आणि तो व्हायरल झाला नाही असे होतच नाही. नुकताच तिने एक बोल्ड व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
मध्यंतरी अंजली अरोराचे नाव एका एमएमएस लीकशी जोडले गेले होते, ज्यामुळे तिची प्रतिमा मलिन झाली होती. असे असूनही, अंजली मात्र धाडसाने या साऱ्याला सामोरी गेली आणि इन्स्टाग्रामवर तिने आपल्या पोस्टची लोकप्रियता कमी होऊ दिली नाही. तिचे फोटो आणि व्हिडिओ कायमच व्हायरल होत असतात. अंजलीने नुकताच एक बोल्ड व्हिडिओ पोस्ट केला आहे. अंजली अरोराने नुसता ओव्हरकोट घालून हा बोल्ड व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये अंजलीने एक ओव्हरकोट घातला आहे. तिने केवळ एका ओव्हरकोटने आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न केला आहे. या बोल्ड व्हिडिओतील अंजलीची स्टाइल आणि अदा थक्क करणारी आहेत. कॅमेऱ्यासमोरील तिच्या या बोल्ड लूकची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. तसेच हा व्हिडीओ चाहत्यांच्याही खूप पसंतीस उतरतो आहे.
या व्हिडिओमध्ये अंजलीचे हावभाव अत्यंत मादक आहेत. तर काहींनी यावर टीका केली आहे. एमएमएस लीकच्या अनुभवातून अंजली काहीही शिकली नसल्याची टीका अनेकांनी केली आहे. तर काही म्हणत आहेत की इतकी वाईट पद्धतीने ट्रोल होऊनही अंजलीने स्वत:ची लोकप्रियता टिकवून ठेवली आहे आणि ती तिच्या हॉट स्टाईलने चाहत्यांना भुरळ घालताना दिसत आहे.
Actress Anjali Arora Bold Video Shoot Viral