इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आलिया भट्ट ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. केवळ अभिनयच नव्हे तर तिने काही व्यवसाय सुरू केले असून यात तिला यश देखील मिळाले आहे. आलिया भट्ट हिची कंपनी लहान मुलांचे कपडे तयार करते. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट हिची कंपनी मुकेश अंबानीची रिलायन्स कंपनी खरेदी करण्याच्या तयारीमध्ये आहे. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ३०० ते ३५० कोटी रुपयांमध्ये मुकेश अंबानी आलिया भट्ट हिची कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आहे.
आलिया भट्टची कंपनी एटर्नलिया क्रिएटिव्ह Ed-a-Mamma ब्रँड लहान मुलांचे कपडे तयार करते. ही कंपनी ताब्यात घेत लहान मुलांचे मार्केट अधिक मजबूत करण्याचा अंबानींचा विचार आहे. याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, Ed-a-Mamma या कंपनीला मुकेश अंबानी ३०० ते ३५० कोटी रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. इकोनॉमिक टाइम्सने याची माहिती दिली. दरम्यान, रिलायन्स आणि इटर्निया क्रिएटिव्ह अँड मर्चेंडायझिंग, एड-ए-मम्माच्या मागे असलेल्या युनिटकडून कोणतेही विधान आलेले नाही.
आलिया क्रिएटिव्ह डायरेक्टर
लहान मुलांचे कपडे तयार करणारी Ed-a-Mamma या कंपनीचे सर्व राईट्स एटर्नलिया क्रिएटिव यांच्याकडे आहेत. आलिया भट्ट या कंपनीची क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे. या दोघांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला पुढील आठवड्यात अंतिम स्वरुप मिळू शकते. आलिया भट्टने या ब्रँडची सुरुवात २०२० मध्ये केली. या ब्रँडअंतर्गत वेगवेगळ्या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मद्वारे कपड्याची विक्री केली जाते. आलिया भट्टची कंपनी नफ्यात आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या विस्ताराचे सत्र सुरुच आहे. या वर्षात अनेक ब्रँड्स दाखल झाले आहेत. आता त्यात अभिनेत्री आलिया भट्टचा लहान मुलांसाठीचा हा ब्रँड देखील अंबानी यांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. हा ब्रँड झटपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला. आता हा ब्रँड रिलायन्स समूहाची ओळख असेल. याविषयीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. या डीलमधून आलिया भट्ट हिला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. रिलायन्स रिटेलच्या चाईल्ड वेअर्स पोर्टफोलिओचा ग्राफ यामुळे वधारेल.
सध्या किड्सवेअर सोबतच हा ब्रँड टीनेज आणि गर्भवती स्त्रियांपर्यंत विस्तारला आहे. मिंत्रा, अजियो, फर्स्ट क्राई, ऍमेझॉन, टाटा क्लिक अशा अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हा ब्रँड आहे. वेबस्टोर, लाईफस्टाईल आणि शॉपर्स स्टॉपसारख्या रिटेल चेन्सच्या माध्यमातून कपड्यांची विक्री करण्यात येते. या कंपनीची सध्या मार्केट व्हॅल्यू १५० कोटी रुपये आहे. ही कंपनी विकत घेऊन व्यवसायाचा विस्तार करण्याचा प्रयत्न रिलायन्स कंपनीचा असेल.