इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरामध्ये आजकाल एकामागून एक आनंदाचे फटाके फुटत आहेत. काही काळापूर्वी नीता आणि मुकेश अंबानी आजी-आजोबा बनले होते. त्याचवेळी त्यांच्या घरात शहनाई वाजली होती. आता अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच वर होणार आहे. काल त्याचा साखरपुडा संपन्न झाला आहे. याच शाही सोहळ्यात अनेक सेलिब्रेटी आले होते. त्यातील अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि तिची कन्या आराध्या ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
अनंत अंबानी यांनी उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत काल साखरपुडा केला. लग्नाचे सर्व विधी अंबानी हाऊस म्हणजेच अँटिलिया येथे गोल धना आणि चुनरी पद्धतीने पार पडले. बॉलीवूडपासून ते क्रीडा आणि व्यवसाय जगतातील अनेक सेलिब्रिटींनी या एंगेजमेंटला हजेरी लावली होती, मात्र बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची सर्वाधिक चर्चा होती. तिने तिच्या लूक आणि सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हिरव्या रंगाचा अनारकली सूट
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटमधील ऐश्वर्या राय बच्चनचा एथनिक लूक चर्चेचा विषय बनला आहे. पार्टीत ऐश्वर्या रायने हिरव्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. या सूटसोबतचा ऐश्वर्याचा रॉयल नेकलेस तिला आणखीनच सुंदर बनवत आहे. यासह, तिने लाल लिपस्टिक, एक सोनेरी क्लच आणि फॅशनेबल हाय हील्स घातल्या, ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक आणखीनच सुंदर झाला.
कन्या आराध्याची सर्वत्र चर्चा
अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्या राय बच्चन सोबत तिची मुलगी आराध्या बच्चन हिचा एथनिक लूक देखील खूप चर्चेत आहे. आईप्रमाणेच मुलीनेही आपल्या लूक आणि स्टाइलने पार्टीला थक्क केले. आराध्याने हेवी एम्ब्रॉयडरी असलेला फिकट गुलाबी रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. आराध्याने या सूटसोबत मॅचिंग दुपट्टाही परिधान केला होता. दुसरीकडे, आराध्याने पहिल्यांदा सोनेरी रंगाच्या मोज्या परिधान केल्या होत्या, ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक आणखी सुंदर होत होता. आराध्याने सुंदर कानातले घातले होते. आराध्या आणि ऐश्वर्याचा फोटो व व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. सर्व जण आराध्याचे आणि तिच्या सौंदर्याचे प्रचंड कौतुक करीत आहेत.
Actress Aishwarya Rai Bachhan Daughter Aaradhya Video Viral