इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं म्हणून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ओळखले जातात. त्यांच्या लग्नाला १५ वर्ष झाली आहेत. आजही त्यांच्या नात्यातील ताजेपणा दिसून येतो. या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सा फारच गमतीशीर आहे. दस्तुरखुद्द अभिषेकनेच त्याची ऐश्वर्याशी पहिली भेट कुठे आणि कशी झाली, याचा खुलासा केला होता. खरं तर जेव्हा अभिषेक-ऐश्वर्याची पहिली भेट झाली तेव्हा ते दोघेही दुसऱ्या व्यक्तींबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. ऐश्वर्या सलमान खानबरोबर होती. तर अभिषेक बच्चन करिश्मा कपूरला डेट करत होता.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. येथे ऐश्वर्या राय बॉबी देओलबरोबर ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती तर अभिषेक एका चित्रपटाचे लोकेशन पाहण्यासाठी आला होता. तेव्हा अभिषेक अभिनेता म्हणून नाही, तर प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करत होता. बॉबी आणि अभिषेक लहानपणापासूनचे मित्र. अनायसे दोघे एकाच ठिकाणी असल्यामुळे त्यांनी भेटण्याचे ठरवले. इथेच बॉबीने ऐश्वर्या रायची अभिषेकशी ओळख करून दिली होती.
अभिषेक तेव्हाची आठवण सांगतो. “बॉबी देओल माझा चांगला मित्र होता. त्याला भेटण्यासाठी मी त्याच्या शूटिंग लोकेशनवर गेलो. त्याने मला डिनरसाठी बोलावलं. या चित्रपटात ऐश्वर्या देखील होती. आणि मी तिच्याशी भेटण्याची, बोलण्याची ती पहिलीच वेळ होती.”
आजही जेव्हा या प्रसंगाची आठवण निघते तेव्हा ऐश्वर्या नेहमी मला, तू तेव्हा काय म्हणत होतास, असं विचारते. त्यावेळी तू जे बोललास, त्यातला एक शब्दही मला समजला नव्हता, असे ती सांगते. हा इंटरनॅशनल बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलेला मुलगा, नंतर बोस्टनला गेला, त्यामुळे याचे इंग्रजी उच्चार अधिक स्पष्ट आणि उत्तम असतील तसेच भाषेवर प्रभुत्व असेल अशी ऐश्वर्याची समजूत होती. पण तसे न झाल्याने अभिषेक तेव्हा काय बोलत होता, हे मला कळले नसल्याचे ती सांगत असते, अशी आठवण अभिषेकने सांगितली आहे.
दरम्यान, कालांतराने ऐश्वर्या आणि अभिषेकचे त्यांच्या पार्टनरबरोबर ब्रेक अप झाले. दोघेही एकमेकांना भेटत असायचे. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘गुरू’, ‘उमराव जान’ आणि ‘धूम २’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘गुरु’ चित्रपटाच्या टोरंटो प्रीमियरमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि ऐश्वर्याने लगेच होकार दिला. त्यानंतर २० एप्रिल २००७ रोजी ‘जलसा’ बंगल्यावर त्यांचे थाटामाटात लग्न झाले. त्यांना एक मुलगी आहे.
From reigning as Miss World 1994 to reign the Indian cinema, this is the story of Aishwarya Rai! A mother, sister and a beauty with a purpose at heart! ?#AishwaryaRai #MissWorld1994 #FeminaMissIndia2023 #JourneyToTheCrown #AreYouReady #FormsAreLive #RegisterNow #TheOGMissIndia pic.twitter.com/dWTyEn2nD2
— Miss India (@feminamissindia) January 4, 2023
Actress Aishwarya Rai Bachchan Actor Abhishek Bachchan 1st Meet
Bollywood