पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून नाजूक आहे. मागील ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती समोर येत आहे.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अनेक दशकं विक्रम गोखले यांनी गाजवली आहे. आपल्या कामाने व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सातत्याने चढउतार बघायला मिळाले. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे. मागील ४८ तासांपासून विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1596021763498201091?s=20&t=3VZ50udwx0UAXWkrTIkvNA
Actor Vikram Gokhale Hospital Health Update