नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘इंडिया दर्पण’ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखमालेची दखल अभिनेता सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. ‘इंडिया दर्पण’मध्ये दर गुरुवारी ‘निसर्ग यात्री’ ही लेखमाला प्रसिद्ध होते. ख्यातनाम लेखिका स्मिता सैंदानकर या त्याचे लेखन करतात. पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याचा परिचयय देणारी ही लेखमाला आहे. याच लेखमालेत आज खलनायकामागचा नायक हा अभिनेता सयाजी शिंदे यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची दखल अभिनेता शिंदे यांनी घेतली आहे.
मराठी, हिंदी व तेलगू चित्रपटात अभिनय करणाऱ्या सयाजी शिंदे यांचे प्रचंड चाहते आहेत. त्यांच्या अनोख्या जीवन कार्यावरील हा लेख अवघ्या काही तासताच प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, हा लेख अभिनेता सयाजी शिंदे यांनीही वाचला. त्यानंतर त्यांनी थेट ऑडिओ क्लीप द्वारे त्यांची प्रतिक्रीया ‘इंडिया दर्पण’कडे पाठविली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, स्मिता सैंदानकर यांचा लेख खूप छान आहे. हा लेख मी देवराईच्या लोकांना पाठवला आहे. प्रतिक्रिया खूप छान आल्या. लेख छान आहे. चांगली मांडणी केली आहे. लेखिकेने अभ्यास केलेला दिसतो. त्यांनी उत्तरोत्तर चांगले लिहावे. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
इंडिया दर्पणच्या बातम्यांबरोबरच लेखमालेलाही वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे यातून सिद्ध होत आहे.
Actor Sayaji Shinde Reaction on India Darpan Article