इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निधन झाले. अभिनेते अनुपम खेर यांनी सर्वप्रथम सोशल मीडिया पोस्टद्वारे या दुःखद बातमीची माहिती दिली. प्राथमिक तपासणीच्या आधारे, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. पण आता या प्रकरणात एक नवा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे पथक फार्म हाऊसमध्ये तपासणीसाठी गेले असता पोलिसांना काही ‘आक्षेपार्ह औषधे’ सापडली. सध्या पोलीस अभिनेत्याच्या सविस्तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट पाहत आहेत. त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
सतीश कौशिक होळीचा सण साजरा करण्यासाठी मुंबईहून दिल्लीत आले होते. येथे त्यांनी होळी पार्टीला हजेरी लावली. अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी होळी पार्टीच्या वेळी फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या पाहुण्यांची संपूर्ण यादी तयार केली आहे. सतीश कौशिकच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या उद्योगपतीचीही पोलिसांना चौकशी करायची आहे.
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, दिल्ली पोलिस म्हणतात, ‘अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी ते तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जिल्हा पोलिसांच्या गुन्हे पथकाने दक्षिण पश्चिम दिल्लीतील होळी पार्टी सुरू असलेल्या फार्महाऊसमधून काही ‘औषधे’ जप्त केली आहेत.
https://twitter.com/ANI/status/1634384328124768257?s=20
Actor Satish Kaushik Death Case Police Investigation