मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेला भाई सलामन खान सी फेस सदनिका निर्माण करत असल्याची माहिती आहे. चित्रपट क्षेत्रातून थे हॉटेल इंडस्ट्रिच्या क्षेत्रात उडी घेत सल्लूभाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सलमान खानचे आर्किटेक्ट सप्रे अँड असोसिएट्स यांनी न्यू डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन अंतर्गत सेंट्रल एअर कंडिशन आणि व्यावसायिक वापर म्हणून या इमारतीसाठी अर्ज केला आहे. या इमारतीत तीन तळघरं आहेत. नवीन प्लॅननुसार पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट सुरू करता येतील. यासोबतच तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल असणार आहे.
Back to life back to reality pic.twitter.com/WDUb8kRUu3
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 3, 2023
इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सर्व्हिसेस, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्याची योजना आहे. तर सातव्या ते १९व्या मजल्याचा वापर हॉटेलसाठी केला जाणार आहे. संच याला मुंबई महानगरपालिकेकडून मंजुरी मिळाली आहे. सलमान खान आणि त्याच्या भावांनी या इमारतीत आधी स्वतःसाठी अपार्टमेंट खरेदी केले होते.
सुरुवातीला रेसिडेन्शीअल प्रॉपर्टी म्हणून त्याचं रिनोवेशन करण्याची त्यांची योजना होती. मात्र, नंतर त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि त्याला हॉटेलमध्ये रुपांतरीत करण्याचा निर्णय घेतला. या इमारतीला हॉटेल बनवण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वीचा आहे, ज्यामध्ये सलमान खानची आई सलमा खान यांचे नाव आहे. त्या या मालमत्तेची मालक आहेत.
हॉटेलही उघडणार
सलमान खान कार्टर रोड, वांद्रे येथे हे आलिशान हॉटेल उघडण्याच्या तयारीत आहे. वृत्तानुसार तो लवकरच रिनोवेशनचं काम सुरू करून हे हॉटेल खुलं करण्याच्या तयारीत आहे.
Boat ho Gaya pic.twitter.com/jpB0lBA7AN
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 20, 2023
Actor Salman Khan Mumbai Sea Face Hotel