मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड अभिनेता सलमान खान याने तब्बल दीड कोटींची गाडी घेतल्याचे कळते. आणि ती देखील बुलेटप्रूफ. नुकताच तो मुंबई विमानतळावर दिसला, तेंव्हा तो याच गाडीत होता. त्यामुळेच ही बातमी वेगाने बाहेर पसरली. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, सलमानकडे टोयोटा लँड क्रुझरची बुलेटप्रूफ कार आहे. या गाडीची किंमत दीड कोटी असून सध्या ती मार्केटमध्ये उपलब्ध नाही.
बिष्णोई गँगकडून त्याला मिळालेल्या धमकीनंतर त्याने ही गाडी विकत घेतल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विविध समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्या या नव्याकोऱ्या गाडीतून सलमान एकदम स्टाईलमध्ये उतरताना दिसतो. त्याच्यासोबत त्याचे सुरक्षरक्षकही दिसतात. त्याला मिळालेल्या धमक्यांनंतर त्याने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन शस्त्र बाळगण्याचा परवाना मागितला होता.
सलमान खान लवकरच टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘गॉडफादर’ या चित्रपटात तो दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी याच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय सध्या सलमानकडे सध्या ‘टायगर 3’ हा चित्रपट आहे. यात कतरीना कैफ आणि इमरान हाश्मी हे त्याचे सहकलाकार आहेत.
Actor Salman Khan Buy Bullet Proof Car Price and details