India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सलमान खानवर लैंगिक शोषणासह गंभीर आरोप; कोण आहे सोमी अली? असा आहे तिचा भूतकाळ

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजन विश्वात कलाकार जेवढे लोकप्रिय तेवढेच त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा अधिक. कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना जाणून घेण्याची कायम इच्छा असते. यामुळेच कधीकधी हे कलाकार आपल्या कामासोबत खासगी आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत येत असतात. बॉलीवूडमधील ‘दबंग’ अभिनेता सलमान खान हा त्यापैकीच एक. सलमान खान आपल्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. त्याच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा कायमच होतात. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले. मात्र, आता एका अभिनेत्रीने सलमान खानवर आता थेट लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

सोमी अली असे या अभिनेत्रीचे नाव असून सोमी ही मूळची पाकिस्तानची रहिवासी आहे. तिने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यात तिने सलमानने माझी फसवणूक केल्याचे म्हटले आहे. सलमानची गर्लफ्रेंड असतानादेखील तो माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, असा तिचा आरोप आहे. मुलाखतीनंतर तिने सोशल मीडियाद्वारे सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

पोस्टमधून तिने सांगितले की ‘सलमानने माझे शारीरिक शोषण तर केलंच पण मला त्याने मारहाणदेखील केली. त्याने मला सिगरेटचे चटकेदेखील दिले आहेत.’ सोमीने सलमानला बॉलिवूडचा ‘हार्वे वाइनस्टीन’ म्हटलं होतं. हॉलिवूड अभिनेता हार्वे वाइनस्टीन याच्यावर अनेक महिला आणि अभिनेत्रींना धमक्या देण्याव्यतिरिक्त बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप आहे.

सलमान सोमीशी जे वागला आहे ते ती अजूनही विसरलेली नाही, आजही ते विचार तिची झोप उडवतात असंही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. सलमानला महिलांनी डोक्यावर घेणं थांबवायला हवं असंही तिने पोस्टमधून सांगितले आहे. याबाबत मात्र सलमानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट पाहून अभिनेत्री सोमी अली त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानसोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन ती भारतात आली. वयाच्या १६ वर्षी तिने आपल्या करियरला सुरवात केली. ९०च्या दशकात तिने अनेक हिट चित्रपट दिले. ते दोघेही एकमेकांना १९९१ ते १९९९ पर्यंत डेट करत होते. १९९९मध्ये सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला, सध्या ती अमेरिकेत स्थायिक असल्याचे समजते.

Actor Salman Khan Allegation Somy Ali Past
Entertainment


Previous Post

चुकीचा तपास भोवला! अखेर पोलिस अधिकाऱ्याला मिळाली ही मोठी शिक्षा

Next Post

बाप रे! कोसळलेल्या विमानाचा अतिशय थरारक व्हिडिओ व्हायरल; बघा, तुमच्याही अंगावर काटा येईल

Next Post

बाप रे! कोसळलेल्या विमानाचा अतिशय थरारक व्हिडिओ व्हायरल; बघा, तुमच्याही अंगावर काटा येईल

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group