गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सैफ अली खान हजारो कोटींचा मालक! पण, आपल्या मुलांना देऊ शकत नाही कवडीचीही संपत्ती; पण का?

by India Darpan
सप्टेंबर 8, 2022 | 5:31 am
in मनोरंजन
0
Saif Ali Khan Family

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड विश्वात छोटे नवाब म्हणून अभिनेते सैफ अली खान प्रसिद्ध आहेत. अनेकदा चर्चेत असलेले सैफ यांची वडिलोपार्जित हजारो कोटी रुपयांची संपत्ती आहे. असे असतानाही छोटे नवाब हे चार मुलांना त्या संपत्तीपैकी एक रुपयाही देऊ शकत नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यात मोठी कायदेशीर अडचण असून सैफ यांच्या मुलांना त्या संपत्तीवर हक्क सांगायचा झाल्यास त्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. प्रसंगी राष्ट्रपतींचे दरवाजे ठोठावावे लागणार आहेत.

बॉलिवूड विश्वातच नव्हे तर सैफ अली खान हे पतौडी घराण्याचे खरेखुरे दहावे नवाब आहेत. क्रिकेट विश्वातले टायगर पतौडी म्हणून प्रसिद्ध असलेले आणि भारतीय क्रिकेट संघात कर्णधार राहिलेले मोहम्मद मन्सूर अली पतौडी हे सैफ यांचे वडील. वडिलोपार्जित घराण्याची जवळपास ५ हजार कोटींची सैफ यांची संपत्ती आहे. हरियाणाच्या पतौडी पॅलेसशिवाय सैफच्या अनेक प्रॉपर्टी भोपाळमध्ये आहेत. सैफ त्याच्या चार मुलांच्या म्हणजेच मुलगी सारा अली खान, मुलगा इब्राहिम, जेह आणि तैमूर यांच्या नावावर ही मालमत्ता करु शकत नाही. याला कारणही तसेच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसशिवाय, त्याच्या मालकीची इतर मालमत्ता भारत सरकारच्या शत्रू विवाद कायद्यांतर्गत येते. या कायद्यानुसार या मालमत्तेवर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही. सैफ अली खानचे पणजोबा हमीदुल्ला खान हे ब्रिटिश राजवटीत नवाब होते. त्यांनी आपल्या मालमत्तेसाठी कोणतेही मृत्यूपत्र तयार केलेले नसल्याचे समजते. या कारणास्तव जर कोणी या मालमत्तेवर दावा केला तर पाकिस्तानमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय त्याबद्दल वाद निर्माण करू शकतात.

या संपत्तीसाठी सैफच्या मुलांना उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयासह राष्ट्रपतींकडे जाण्याचाही पर्याय स्वीकारावा लागेल. सैफ अली खानच्या मुलांना त्याच्या ५ हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर हक्क सांगायचा असेल तर त्यांना आधी उच्च न्यायालयात जावे लागेल. येथून हरल्यास ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. यानंतर देशाच्या राष्ट्रपतींकडे जाण्याचा पर्यायही त्यांच्याकडे असणार आहे.

Actor Saif Ali Khan Wealth Property Cant Handover to Son’s but why
Bollywood Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावळ्या-गोंधळाचा कळस! नव्या रेल्वे ट्रॅकच्या मधोमधच वीजेचे खांब उभारले

Next Post

व्हॉटसअॅपच्या नव्या अपडेटमध्ये मोठीच गडबड; आपोआप होताय हे बदल

India Darpan

Next Post
whatsapp e1657380879854

व्हॉटसअॅपच्या नव्या अपडेटमध्ये मोठीच गडबड; आपोआप होताय हे बदल

ताज्या बातम्या

Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011