इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – किंग खान अर्थात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे जगभरात चाहते आहेत. या क्षेत्रातही त्याला अनेकजण आयडॉल मानतात. त्याच्या चाहत्यांची संख्या तर विचारायलाच नको. अहिनेत रितेश देशमुख हा देखील शाहरुखचा चाहता आहे. अलिकडेच रितेशने शाहरुख खान सोबत आपली पहिली भेट कशी होती, याची माहिती दिली. नुकताच त्याने एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियाशी गप्पा मारल्या. याचवेळी शाहरुख खानमुळे आपल्याला लागलेल्या एका सवयीची देखील त्याने माहिती दिली. आता ही सवय सोडणे शक्य नाही, उलट आता तर हे माझ्यासाठी अफेअर सारखे झाले असल्याचे रितेश सांगतो.
मी शाहरुख खानचा मोठा फॅन आहे. तो माझ्या वडिलांना भेटण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांना पाहून मी खूप आनंदी झालो होतो, असे रितेश सांगतो. शाहरुखला भेटल्यानंतर मी त्यांना काय घेणार अशी विचारणा केली. त्यावर शाहरुखने काहीच घेणार नसल्याचं म्हटलं. मात्र मी थोडा आग्रह केल्यानंतर त्याने ब्लॅक कॉफी घेणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी पहिल्यांदा ब्लॅक कॉफी काय असते, ते मला शाहरुखमुळे कळालं,” असे माहिती रितेशने तमन्नाशी गप्पा मारताना सांगितले. रितेश आणि तमन्नाचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
जेव्हा शाहरुखने मला ब्लॅक कॉफी मागितली तेव्हा मी माझ्या शेफला ब्लॅक कॉफी बनवण्यास सांगितली. पण त्यालाही याबद्दल माहिती नव्हती. तरीही त्याने कोणाच्या मदतीने किंग खानसाठी ब्लॅक कॉफी बनवली. मला ब्लॅक कॉफीबद्दल खूप उशीरा कळलं आणि मग मी ती प्यायला सुरुवात केली. आता ब्लॅक कॉफीशी माझं नातं अफेअरसारखं झालं आहे. रितेश आणि तमन्ना भाटिया पहिल्यांदाच रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘बबली बाउन्सर’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्श्न शशांक घोष यांनी केलंय. हा चित्रपट २३ सप्टेंबर २०२२ रोजी डिस्नी प्लस हॉटस्टावर प्रदर्शित झाला आहे.
Actor Riteish Deshmukh Habit Sharukh Khan