मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूडमधील बहुर्चित जोडी असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी अखेर आज लग्नगाठ बांधली. अतिशय मोजक्या व्यक्ती आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. हा सोहळा होताच आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यात हे दिसते आहे की लग्नगाठ बांधल्यानंतर रणबीरने आलियाला किस केला आहे. तसेच, लग्नात ही जोडी प्रचंड खुष आहे. या सोहळ्यासाठी दोघांचा पेहराव अतिशय आलिशान स्वरुपाचा होता. सोहळ्यासाठी अनेकविध सुविधा आणि अन्य बाबी आकर्षणाचा केंद्रबिंदू होते.
बघा, या समारंभ आणि जोडीचे हे खास फोटो