इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्या घरी चोरी झाली आहे. घरातील लॉकरमधून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरीची माहिती मिळताच ऐश्वर्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्यामध्ये तिने नमूद केले आहे की, एकूण ३.६० लाख रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेले आहेत . या प्रकरणी ऐश्वर्याने तिनामुपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ऐश्वर्याने तक्रारीत म्हटले आहे की, तिने शेवटचे दागिने २०१९ मध्ये बहीण सौंदर्याच्या लग्नासाठी घातले होते. चोरीच्या दागिन्यांमध्ये हिऱ्यांचे सेट, जुने सोन्याचे दागिने, नवरत्न सेट, हार आणि बांगड्यांचा समावेश आहे. बहिणीच्या लग्नात परिधान केल्यानंतर हे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र १० फेब्रुवारीला पाहिले असता दागिने नव्हते.
Actor Rajnikant Daughter Aishwarya Home Gold Jewellery Stolen