इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता पियुष मिश्रा यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ‘तुम्हारी औकात क्या है, पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्रात त्यांनी बालपणी घडलेला एका धक्कादायक अनुभव सांगितला आहे. शाळेत असतानाच एका महिला नातेवाईकाने कशाप्रकारे आपलं लैंगिक शोषण केलं होतं, हे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलं आहे. ही घटना ५० वर्षांपूर्वीची आहे. मात्र, या घटनेचा माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. त्याहीपेक्षा या अनुभवानंतर त्यांना शरीरसंबंधांबद्दल भीती वाटू लागल्याचे त्यांनी सांगितले.
“जवळपास ५० वर्षांपूर्वीची घटना आहे. मी माझ्या पुस्तकात फक्त सत्य काय आहे तेच लिहिलं आहे. त्यावेळी मी ७ व्या इयत्तेत शिकत होतो. फक्त लोकांची नावं बदलली आहेत. कारण मला कोणचाही बदला घ्यायचा नव्हता. पण, ही घटना आयुष्यात मला कायम लक्षात राहिली.”
पियुष मिश्रा सांगतात, “शरीरसंबंध ही आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. या गोष्टीचा अनुभव जेव्हा तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच घेता, तेव्हा त्याची सुरुवात चांगली व्हायला हवी. हा अनुभव जर चांगला नसेल, तर आयुष्यभर याची भीती तुमच्या मनात राहते. या लैंगिक शोषणाच्या अनुभवातून बाहेर पडण्यासाठी मला खूप काळ संघर्ष द्यावा लागला. अनेकांच्या मदतीने मी यातून बाहेर पडलो आहे.
आपल्या बालपणापासूनचे आयुष्य पियुष मिश्रा यांनी आत्मचरित्रात मांडले आहे. त्यानंतर दिल्लीच्या कल्चरल हब मंडी हाऊसचे दिवस ते मुंबईपर्यंतचा प्रवास या सगळ्या गोष्टी या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या लैंगिक शोषणाबाबत माहिती देताना ते म्हणतात, मी काही लोकांची ओळख लपवू इच्छित होतो. त्यातील काही स्त्रिया आणि काही पुरुष आता फिल्म इंडस्ट्रीतील मोठी नावं आहेत. मला कोणत्याही प्रकारचा बदला घ्यायचा नाही किंवा कोणालाही दुखवायचं नाही.”
Actor Piyush Mishra on Sexual Abuse Incidence