इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घरातील कौटुंबिक वाद चांगलेच चव्हाट्यावर आले आहेत. दररोज त्याची पत्नी त्याच्यावर काही न काहीतरी नवीन आरोप लावते आहे आणि नवाजुद्दीन त्याला उत्तरं देताना दिसतो आहे. नुकतंच नवाजुद्दीनला त्याच्या आईला भेटण्याची परवानगी देखील नाकारल्याचे समोर आले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपासून दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. नवाजुद्दीनचे अफेअर असल्याचे आरोप त्याच्या पत्नीने केले आहेत. तर मुलीसंदर्भातही अनेक गंभीर आरोप तिने पतीवर केले. त्यानंतर शुक्रवारी आलिया सिद्दीकीने दोन व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन याने आपल्याला मुलांसह रात्री घराबाहेर काढल्याचा आरोप केला. या आरोपांवर आता नवाजुद्दीनने उत्तर दिलं आहे.
https://twitter.com/Raajeev_Chopra/status/1631668540477689856?s=20
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या प्रवक्त्याने आलियाने लावलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. आलियाने जे काही बोलली ते खोटं असल्याचा दावा नवाजुद्दीनच्या प्रवक्त्याने केला आहे. नवाजुद्दीनने सगळी संपत्ती आधीच त्याची आई, मेहरुनिसा सिद्दीकी यांच्या नावावर केली आहे आणि त्यामुळे तो कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्या आईच्या केअरटेकरने आलियाला घरात प्रवेश नाकारला असला तरी मुलांना घरात येण्याची परवानगी दिली आहे. नवाजुद्दीनने आधीच आलियासाठी मुंबईत एक फ्लॅट घेतला होता, जो तिने सध्या भाड्याने दिला आहे, असंही या प्रवक्त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, आजारी आईला भेटायला गेलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीला भावाने गेटवर अडवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आलिया सिद्दीकीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. त्यात पतीने मुलांबरोबर रात्री बाहेर काढल्याचा दावा तिने केला होता. त्या व्हिडीओत त्यांची मुलगी शोरा हमसून हमसून रडताना दिसत होती.
https://twitter.com/imrajni_singh/status/1631548861297860608?s=20
Actor Nawazuddin Siddiui on Child and Wife Night Stay on Road