India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोण होणार करोडपती’ मध्ये अभिनेता अशोक सराफ खेळणार खेळ

India Darpan by India Darpan
June 22, 2022
in मनोरंजन
0

 

मुंबई – मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे कोण होणार करोडपतीच्या मंचावर सहभागी होणार आहेत. अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका- कोण होणार करोडपती – विशेष भाग, २५ जून, रोजी शनिवारी रात्री ९ वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्णभूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. अभिनयातल्या अशा तळपणाऱ्या सूर्याच्या येण्यानी कोण होणार करोडपती चा मंच उजळून निघणार आहे.

पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ कोण होणार करोडपती चा खेळ खेळणार आहेत. अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, नवरा माझा नवसाचा असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यांचा ‘ययाती’पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या ‘व्हॅक्युम क्लिनर’पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे.अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला. मनोरंजन सृष्टीत पदार्पण

करण्यापूर्वी अशोक मामा बँकेत नोकरी करायचे आणि एकीकडे नाटकाचे दौरे करायचे. त्या वेळी खोटी मेडिकल सर्टिफिकेट देऊन बँकेतघेतलेल्या सुट्ट्यांचे मजेदार किस्से मामा आणि त्यांचे बंधू यांनी यावेळी सांगितले. लहानपणी प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याबरोबर नाटकात काम केल्याच्या आणि त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळल्याच्या आठवणीही मामांनी सांगितल्या.

ययाती आणि देवयानी ह्या नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केलं, प्रेमा तुझा रंग कसा या नाटकातला पँटची नाडी सुटल्याचा गमतीशीर किस्सा,’भस्म’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, संगीताची आवड; अशा अनेक आठवणी आणि किस्से यांमुळे ‘कोण होणार करोडपती’चा हा विशेष भाग अधिकच रंगतदार होणार आहे. अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार माणसाला कोण होणार करोडपती च्या मंचावर पाहणं, ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. पाहायला विसरू नका -‘कोण होणार करोडपती’- विशेष भाग, २५ जून, शनिवारी रात्री ९ वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

विभागीय आयुक्तांचा कठोर निर्णय; ७ सरपंच, १ उपसरपंच, १ सदस्यावर अपात्र कारवाई

Next Post
प्रातिनिधिक फोटो

विभागीय आयुक्तांचा कठोर निर्णय; ७ सरपंच, १ उपसरपंच, १ सदस्यावर अपात्र कारवाई

ताज्या बातम्या

‘अशी सत्ता पसंत नाही’; महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात अटल बिहारींचे भाषण व्हायरल

June 25, 2022

निलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदी ३ वर्षे पूर्ण; त्यांच्या कारकिर्दीचा हा आढावा…

June 25, 2022

क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याच्या नियमात येत्या १ जुलैपासून बदल; जाणून घ्या सविस्तर

June 25, 2022

आता भारतातच होणार वाहनांचे क्रॅश टेस्टिंग; सेफ्टी रेटिंगही मिळणार

June 25, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

June 25, 2022
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

मंगलाष्टकावेळी वधू-वरामध्ये कडाक्याचे भांडण; नंतर पुढं हे सगळं घडलं

June 25, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group