सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्ये दातार नगर भागात बोगस व बनावट पदवी घेऊन खासगी रुग्णालय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हाजी अन्सारी मोहम्मद वसीम अब्दुल रशीद असे या बोगस डॉक्टरचे नाव असून महापालिकेच्या आरोग्य पथकाला याची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांच पथक तेथे गेले. या ठिकाणी दोन पत्र्यांच्या खोल्यांमध्ये हा डॉक्टर रुग्णांची तपासणी करत असतांना आढळून आला, तर एका रुग्णाला चक्क खुर्चीत बसवून त्याला सलाईन लावल्याच निदर्शनास आले. दरम्यान या डॉक्टर विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याच काम सुरु होते.
मागील आठवड्यात नगर जिल्ह्यात आलेल्या बोगस डॉक्टरने चक्क जनावरांची औषधे व इंजेक्शन माणसांना दिल्याचा प्रकार ताजा असताना आता मालेगावात बोगस डॉक्टर सापडला आहे. मालेगाव येथे या कथीत ‘मुन्नाभाई ‘ला कोणतीही वैद्यकीय डिग्री नसताना उपचार करताना आढळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खोलीच्या रुग्णालयात त्याचा हा बोगस व्यवसाय सुरू होता. रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाऊ लागली आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात विशेषतः मालेगाव शहर व तालुक्यात बोगस डॉक्टरचे जणू काही पेवच फुटले आहे, जळगाव जिल्ह्यातही काही वर्षांपूर्वी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला होता, औरंगाबाद मध्ये देखील बोगस डिग्री किंवा डिग्री नसलेल्या अनेक कथित डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली होती. त्यानंतर आता मालेगाव येथे पुन्हा असाच प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना चक्क दोन खोलींचं रुग्णालय उभारणाऱ्या मालेगावातील या मुन्नाभाईचं नाव अन्सारी मोहम्मद वसीम हाजी अब्दुल रशिद असं आहे. मालेगावचा मुन्नभाई असलेल्या या तरुणावर अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मालेगावच्या पवारवाडी पोलिसांकडून याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्दी ताप यास आजारांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी अन्सारी या बोगस डॉक्टरकडे येत असत. तर कोणताही डिग्री नसलेल्या मालेगावच्या या ‘मुन्नाभाई’ने गैरप्रकार केला. त्यामुळे त्याचं बिंग फुटलंय. अखेर मनपा उपायुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी या बोगस डॉक्टरला रंगेहाथ अटक केली आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे वैद्यकीय सरावावेळी या मुन्नाभाईने उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला चक्क खूर्चीत बसवलं आणि सलाईन लावलं होतं. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मालेगावात खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी रितसर तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला.
मालेगाव शहर व ग्रामीण रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.मनपा उपायुक्त, आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईनंतर आता अन्सारी याची आता कसून चौकशी केली जात आहेत.
Nashik Malegaon Crime Bogus Doctor Health Action Police