रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ऋषभ पंत क्रिकेट कधी खेळणार? तो आता भारतीय संघात दिसेल की नाही? बघा, तज्ज्ञ काय सांगताय

जानेवारी 2, 2023 | 3:37 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
FlO8Eh aMAM7Y I e1672653827967

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय क्रिकेट संघाचा फटकेबाज फलंदाज ऋषभ पंत याच्या अपघातामुळे त्याच्या करियरबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. अलीकडेच डॉक्टरांनी त्याला किमान अर्धे वर्ष बिछान्यावर काढावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. अर्थात व्यायाम आणि औषधांच्या पलीकडे त्याचं दुसरं विश्व नसणार आहे, असाच त्याचा अर्थ आहे.

सरत्या वर्षाच्या अखेरीस ऋषभ पंतचा जोरदार अपघात झाल्याचं कानावर पडलं आणि क्रिकेटप्रेमींच्या मनात धस्स झालं. थोडक्यात निभावल्यामुळे ऋषभचे प्राण वाचले. पण आता त्याला बरेच दिवस क्रिकेटला मुकावे लागणार आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे आणि दुखापत सुद्धा गंभीर नाही. ज्या जखमा झालेल्या आहेत, त्याही गंभीर नाहीत, पण फॉर्मात असलेल्या क्रिकेटपटूसाठी कुठलीही छोटी दुखापत सुद्धा चिंताजनक असते. ऋषभ पंतच्या बाबतीत तसेच झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी सात महिने ऋषभला आराम करावा लागणार आहे. त्यानंतरही तो हळूहळू सराव सुरू करेल आणि त्यामुळे पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यासाठी त्याला एक वर्ष लागू शकतं, असा अंदाज क्रिकेटतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्धच्या मालिका आणि आयपीएलच्या अख्ख्या हंगामाला तो मुकणार आहे, हे तर निश्चित झाले आहे. पण वर्षाअखेरीस होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतही ऋषप पंतची फटकेबाजी बघायला मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. एकूणच ऋषभचे अख्खे वर्ष वाया जाणार, असे चित्र सध्या आहे. कारण त्याच्या जखमा बऱ्या झाल्या तरी फिटनेस सिद्ध करणे आणि पुन्हा सराव सुरू करणे, ही मोठी प्रक्रिया त्याला पार पाडायची आहे.

क्रिकेटमध्ये फिटनेसला मोठं महत्त्वं आहे. हातापायाला दुखापत असेल तर मग मोठ्या स्पर्धांसाठी संघात विचारही केला जात नाही. ऋषभच्या हाताला, मनगटाला, गुडघ्याला बऱ्यापैकी दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेट खेळण्यावर, फिटनेसवर चांगल्याच मर्यादा असणार आहेत. कदाचित आठ महिन्यांनी पुन्हा एकदा तो कमबॅक करून दमदार कामगिरी करेल, पण त्यासाठी त्याला आणि क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Road Accident Indian Cricketer Rishabh Pant Health Recovery
Sports Doctor Experts

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा आहे महाराष्ट्र पोलिस दलाचा इतिहास; …म्हणून २ जानेवारी आहे पोलिसांसाठी खास

Next Post

संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता परिसरातील बांधकामांना बंदी; बघा, काय आहे नियम?

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
file photo

संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय! आता परिसरातील बांधकामांना बंदी; बघा, काय आहे नियम?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011