नाशिक- अशोका मार्ग भागात भरधाव दुचाकी खड्ड्यात आदळल्याने मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज उपचारा दरम्यान मृत्यु झाला. भावेश किशोर कोठार (४० रा.बिगबाजार ना.रोड) असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कोठार गेल्या २२ जून रोजी रात्री क्रोमा शो रूम पाठीमागून अशोका मार्गच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हावर प्रवास करीत असताना हा अपघात झाला होता. पायोनियर हॅास्पिटल समोर भरधाव दुचाकी खड्ड्यात आदळल्याने कोठार गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी पोलीस नाईक सिध्दार्थ बिरारी यानी दिलेल्या तक्रारीवरून मृत चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.