गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आठ लाखाच्या लाच प्रकरणातील आरोपी शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली वीर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

by India Darpan
ऑगस्ट 13, 2021 | 3:01 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
veer

नाशिक – तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली वीर-झनकर यांना शुक्रवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.उद्या परत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्यानंतर त्या दोन दिवसापासून फरार होत्या. पण, आज पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी वैशाली वीर यांच्यासह दोन जणांवर लाच प्रकरणी कारवाई केली होती. पण, महिला असल्याने सुर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावत वैशाली वीर यांना दिराच्या ताब्यात दिले होते. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण त्या हजर राहिल्या नाही. त्यानंतर न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार झाल्याचे न्यायालयात सांगितले. पण, या प्रकरणातील वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर आता वीर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

असे अडकले सापळ्यात
नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली पंकज वीर- झनकर यांच्यासह तीन जण ८ लखाची लाच घेतांना मंगळवारी सापळ्यात अडकले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या पथकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य केले. या प्रकरणात तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता लाच प्रकरणातील आरोपी पंकज रमेश दशपुते (राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक) यांनी आरोपी वैशाली वीर- झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयाची मागणी केली. त्यांनंतर दिनांक २७ जुलै २०२१ रोजी वीर यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती आठ लाख स्वीकारल्याचे मान्य करून लाचेचा पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले. सोबत करण्या बाबत सांगितले. त्यांनंतर १० ऑगस्ट रोजी येवले यांनी वीर यांचे करीत तक्रारदार यांचे कडून ८ लाख रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

 

मंगळवारी असा होता सापळा
▶️ युनिट – ठाणे
▶️ *तक्रारदार- पुरुष वय ४५वर्षे
▶️ आरोपी- १) श्रीमती वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक.
२)ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले.शासकीय वाहक चालक.
३) पंकज रमेश दशपुते,प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक.
▶️ *लाचेची मागणी-* ९,००,०००/- रुपये
▶️ *लाच स्विकारली* तडजोड अंती रु.८,००,०००/-
▶️ *हस्तगत रक्कम-* ८,००,०००/-रुपये.
▶️ *लाचेची मागणी -* ता.०६/०७/२०२१, २७/०७/२०२१
▶️ *लाच स्विकारली -*
दि.१०/०८/२०२१ रोजी १७:३० वा.
▶️ *लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत चा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी क्र.३) यांनी आरोपी क्र.१) यांचे करिता ९,००,०००/- ₹ मागणी केली त्यांनंतर दिनांक २७/०७/२०२१ रोजी आलोसे क्रमांक 1 यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती 8,00,000 स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक 2 यांचे सोबत करण्या बाबत सांगितले त्यांनंतर दिनांक 10/8/21 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले
▶️ *सापळा अधिकारी-* श्रीमती पल्लवी ढगे पाटील ए. सी. बी. ठाणे
▶️ सह सापळा अधिकारी पो नि मते
▶️ *सापळा पथक*
पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चापोहवा/शिंदे
▶️ *मार्गदर्शन अधिकारी – *मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*
▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी*
अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई
———————-
अँन्टी करप्शन ब्युरो, ठाणे
दूरध्वनी क्र 27833344

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – पैशांची बॅग साभांळण्यास सांगून महिलेचे दोन लाखाचे दागिने भामटयांनी केले लंपास

Next Post

ट्वीटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे – नवाब मलिक

India Darpan

Next Post
nabab malik

ट्वीटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे - नवाब मलिक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011