नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओमनी गाडी वर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय करणा-यांवर कोणतेही कायदेशीर कारवाई न करणेबाबत ४००० रुपयाची लाच घेतांना धुळे येथील देवपूर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार एजाझ काझी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे देवपूर पोस्ट हद्दीत ओमनी गाडी वर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून सदरचा व्यवसाय करून देण्यासाठी व कोणतेही कायदेशीर कारवाई न करणेबाबत यातील पोलिस हवालदार काझी यांनी तक्रारदार यांच्याकडे ४००० रुपयाच्या लाचेची मागणी करून त्यांचे कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. त्यांचे विरुद्ध देवपूर पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
युनिट – ला.प्र.वि. नाशिक.
तक्रारदार- पुरुष, 50 वर्ष.
आरोपी– एजाझ काझी, वय- 52 वर्ष, पावन (पो.हवा. 1213), देवपूर पो. स्टे. रा. पोलीस मुख्यालय, धुळे
*लाचेची मागणी- दिनांक 15.10.2024 रोजी 4,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 15.10.2024 रोजी 4,000/- रु.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार हे देवपूर पोस्ट हद्दीत ओमनी गाडी वर सोडा विक्री करण्याचा व्यवसाय करीत असून सदरचा व्यवसाय करून देण्यासाठी व कोणतेही कायदेशीर कारवाई न करणेबाबत यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 4,000/- रू लाचेची मागणी करून त्यांचे कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध देवपूर पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
आलोसे यांचे सक्षम अधिकारी- पोलीस अधीक्षक, धुळे.
*सापळा अधिकारी– *अमोल वालझाडे, पो. निरी.,ला.प्र. विभाग, नाशिक
*सापळा पथक – पो.हवा. प्रभाकर गवळी, पो. कॉ. सुरेश चव्हाण *सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक युनिट .