दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील कसबे वणी येथील तलाठी शांताराम पोपट गांगूर्डे १० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. विकत घेतलेल्या शेतजमीन आकारा बाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी ही लाच घेतली. याप्रकरणी एसीबीने तलाठी विरूध्द वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांची मालकीची कसबे वणी ता. दिंडोरी येथील शेत जमीन गट न. ६१७ वर कर्ज काढावयाचे असल्याने ते कसबे वणी गांवचे तलाठी गांगूर्डे यांना भेटून त्यांच्या मालकीच्या वर नमूद शेत गटाचे फेरफार नोंदी मिळणे बाबत विनंती केली असता, सदर फेरफार नोंदी ह्या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे तलाठी यांनी तक्रारदार यांना सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे तहसील कार्यालय दिंडोरी येथे गेले असता त्यांना पाहीजे असलेल्या नोंदी मिळाल्या. परंतु सध्याच्या तीन नोंदी त्यांना वणीचे तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितल्यामुळे, तक्रारदार पुन्हा तलाठी श्री गांगूर्डे यांना भेटले असता, तलाठी यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुम्ही विकत घेतलेल्या शेतगट नंबर ६१७ चे उताऱ्यावरील शेतजमीन आकारा बाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत.
त्या दुरुस्त करण्यासाठी मला पैसे दिले तर मी तुम्हाला त्या दुरुस्ती करून फेरफार नोंदी देवु शकतो असे सांगून आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना आलोसे यांना लाच द्यावयाची नसल्याने, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दिनांक २५/०९/२०२४ रोजी लाच पडताळणी कारवाई दरम्यान १० हजार रुपये लाचेची शासकीय पंचां समक्ष मागणी करून सदरची लाच रक्कम आज दिनांक २६/०९/२०२४ रोजी आलोसे यांनी त्यांचे कार्यालयात शासकीय पंच साक्षीदार यांचे समक्ष १० हजार रुपयाची लाच स्वीकारली असता रंगे हात पकडण्यात आले असून, तलाठी यांचे विरूध्द वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई**
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरूष वय-३५
*आलोसे-शांताराम पोपट गांगूर्डे वय ५१ वर्षे, तलाठी सज्जा कसबे वणी ता . दिंडोरी वर्ग-३, रा. ध्रुव नगर, मोतीवाला मेडिकल कॉलेज समोर, रेणुका हाइट्स, फ्लैट नंबर ९, सातपुर नाशिक
*लाचेची मागणी- १००००/-
*लाच स्विकारली- १००००/-
*हस्तगत रक्कम- १००००/-
*लालेची मागणी – दि.२५/०९/२०२४
*लाच स्विकारली – दि.२६/०९/२०२४
*तक्रार:-तक्रारदार यांना त्यांची मालकीची कसबे वणी ता. दिंडोरी येथील शेत जमीन गट न. ६१७ वर कर्ज काढावयाचे असल्याने ते कसबे वणी गांवचे तलाठी आलोसे श्री गांगूर्डे यांना भेटून त्यांच्या मालकीच्या वर नमूद शेत गटाचे फेरफार नोंदी मिळणे बाबत विनंती केली असता, सदर फेरफार नोंदी ह्या दिंडोरी तहसील कार्यालयात मिळतील असे आलोसे यांनी तक्रारदार यांना सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे तहसील कार्यालय दिंडोरी येथे गेले असता त्यांना पाहीजे असलेल्या नोंदी मिळाल्या परंतु सध्याच्या तीन नोंदी त्यांना वणी चे तलाठी यांच्याकडे मिळतील असे सांगितल्यामुळे, तक्रारदार पुन्हा आलोसे तलाठी श्री गांगूर्डे यांना भेटले असता, आलोसे यांनी तक्रारदार यांना सांगितले की, तुम्ही विकत घेतलेल्या शेतगट नंबर ६१७ चे उताऱ्यावरील शेतजमीन आकारा बाबतच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी मला पैसे दिले तर मी तुम्हाला त्या दुरुस्ती करून फेरफार नोंदी देवु शकतो असे सांगून आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना आलोसे यांना लाच द्यावयाची नसल्याने, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दिनांक २५/०९/२०२४ रोजी लाच पडताळणी कारवाई दरम्यान १००००/- रू. लाचेची शासकीय पंचां समक्ष मागणी करून सदरची लाच रक्कम आज दिनांक २६/०९/२०२४ रोजी आलोसे यांनी त्यांचे कार्यालयात शासकीय पंच साक्षीदार यांचे समक्ष १००००/- रू ची लाच स्वीकारली असता रंगे हात पकडण्यात आले असून, आलोसे यांचे विरूध्द वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
*सापळा अधिकारी – श्री.नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं.9284661658
सापळा पथक
पोलीस नाईक विनोद चौधरी,
पोलीस शिपाई अनिल गांगोडे,
चालक पोलीस नाईक परशुराम जाधव