रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आठवणीतील साहित्य संमेलन – बडोद्याचे साहित्य संमेलन

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 10:28 am
in इतर
0
IMG 20211117 WA0002 e1637211490624

९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ..बडोदा..

आम्ही ३/४ मैत्रिणी मिळून माझ्या स्वत:च्या गाडीने हौसेने संमेलनाला गेलो होतो. तसे ही मला नेहमीच संमेलनाला जायला आवडते , त्या ३/४ दिवसात जे वैचारिक खाद्य मिळते त्याने मी तृप्त होऊन जाते.संमेलनाच्या राजकारणाशी आपला काही संबंध नसतो , मी मिळवते तो निखळ आनंद …!

बडोदा .. राजाचं गाव .. आणि राजाच्या नावलौकिकाला शोभेल असे साहित्य संमेलन पाहून मन तृप्त झाले. अहो, ग्रंथ दिंडीच इतकी छान होती की बघत रहावी ..कपडे, त्यांचा थाटमाट, भव्य आणि दिव्य अशी ती ग्रंथदिंडी आम्ही पुरेपूर अनुभवली. शहरातल्या ५ स्टार हॅाटेलचे आमचे बुकिंग होते व हाताशी अलिशान गाडी .. मग काय ? नुसती मजा लुटायची …!

भव्य असा उद्घाटन समारंभ झाला. भव्य शामियाना अन सारी चोख व्यवस्था नि बडोदेकर अतिशय शांत नि सुसंस्कृत..! कुठेही गडबड गोंधळ नाही. लक्ष्मीकांत भट अध्यक्ष होते. महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरी दुमदुमली होती यात शंकाच नाही .३ दिवस अक्षरश: साहित्यिक मेजवानीचा आस्वाद आम्ही घेत होतो. परिसंवाद ,त्यांचे
विषय व बोलणारे वक्ते अतिशय अभ्यासपूर्ण बोलत होते. सभागृह खचाखच भरलेले असे. मुंगी शिरायला वाव नसे.
प्रत्येकच परिसंवाद दर्जेदार असल्यामुळे कुठे हजेरी लावावीअसा संभ्रम होत असे. बडोदा नगरी , राजवाडा ही पहायची उत्सुकता होतीच. जमेल तसा वेळ काढून बडोदा शहर व राजवाडा आम्ही पाहिला नि राजवाडा पाहून थक्क झालो. किती अलिशान जीवन जगत होते आमचे राजे महाराजे! धन्य झालो. गार्डन खूप मोठे आहे ते ही पाहिले.

परिसंवाद ते अध्यक्षिय भाषण.. दणकेबाज असे… आम्ही काहीही चुकविले नाही. कवि संमेलन बहारदार झाले.
आणि मग शेवटचा बडोद्याची खरी संस्कृती दाखवणारा बहारदार,भव्य,उत्तम गायिकांच्या व गायकांच्या गाण्यांनी
तृप्त करणारा कार्यक्रम कायमचा मनावर कोरला गेला. मुंबईच्या १९८१ च्या संमेलना पासून गोवा कोल्हापूर ते
यवतमाळ अशी संमेलने मी अनुभवली पण लक्षात राहिले ते बडोदा संमेलन सर्वच बाबतीत उजवे होते असे मला वाटते. लिहिण्यासारखे खूप आहे.. आता थांबते… आम्ही खूप ग्रंथ खरेदी केली. राजाचे खंडही विकत घेतले.

  • प्रा. सौ. सुमती पवार
    सारंग, वाघ गुरूजी शाळे समोर, पंपिंग स्टेशन रोड, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३
    (९७६३६०५६४२) svpawar6249@gmail.com

संकलन -प्रा. लक्ष्मण महाडिक
(आपले अनुभव पाठविण्यासाठी संपर्क करा 9422757523)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ओझर विमानतळावरुन या वेळेत आहे विमानसेवा (संपूर्ण वेळापत्रक)

Next Post

क्रांती रेडकरने शेअर केला समीर वानखेडे यांचा जन्म दाखला

Next Post
kranti redkar

क्रांती रेडकरने शेअर केला समीर वानखेडे यांचा जन्म दाखला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011