कार्तिकी-देव उठणी एकादशी
– पंडित दिनेश पंत
“आषाढी कार्तिकी भक्तजन येती, “पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. कार्तिक एकादशीलाच भागवत एकादशी, उत्थान एकादशी असे म्हणतात. पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी वारी प्रमाणेच कार्तिक वारीलाही लाखो वारकरी दिंड्या पताकांसह पांडुरंगाच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येतात. पांडुरंगाच्या दर्शनासह भजन-कीर्तन गात त्याचप्रमाणे चंद्रभागेच्या स्नानाने जीवन कृतार्थ झाल्याच्या भावनेचे संचित घेऊन परततात.
कार्तिक एकादशीला नदी स्नान उपवास, देवदर्शन, भजन, कीर्तन, जागरण करण्याचे महत्त्व स्कंदपुराणामध्ये ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले असल्याची पुराणकथा आहे. देवशयनी एकादशी अर्थात चातुर्मासाच्या सुरुवातीला देवविश्राम करण्यासाठी जातात. ते आज चातुर्मास समाप्ती निमित्त कार्तिकी एकादशीला उठतात. म्हणून आजच्या एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात.
आजच्याच दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णू (शाळीग्रामशी) त्यांच्याशी करून तुळसी विवाह प्रारंभ होतात. आज कार्तिक एकादशीला नदीस्नान, श्री विठ्ठल पूजन, विष्णू पूजन, भजन, दानधर्म, पूर्ण दिवस उपवास, त्याचप्रमाणे कीर्तन, जागर यास विशेष धार्मिक महत्त्व आहे.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1460101172446986244