विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. परंतु काही ठिकाणी लसींची टंचाई जाणवत असल्याने अनेक नागरिकांना लसीचा केवळ पहिला डोस मिळाला असून त्यांना अद्याप दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. तर काही नागरिकांना अजून पहिला डोस देखील उपलब्ध झालेला नसल्याने सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये या संबंधित सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सेतू ॲप वर माहिती उपलब्ध आहे.
देशातील लोकांच्या सोयीकरिता आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय कोरोना संबंधी सरकारी अॅप अद्ययावत करत राहते. आरोग्य सेतु अॅपवरून आता कोरोना लसीकरणाची स्थिती देखील मिळू शकते. मंत्रालयाने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता तुमची लसीकरण स्थिती आरोग्य सेतूवर अद्ययावत केली जाऊ शकते.










