इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आता जनतेला आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सौराष्ट्रात जनतेला संबोधित केले. तर, रविवारी संध्याकाळी पंचमहाल जिल्ह्यातील हलोलमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रोड शो काढला. यावेळी लोकांच्या एका गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
रविवारी संध्याकाळी पंचमहाल जिल्ह्यातील हलोल येथे रोड शो दरम्यान एका सभेला उत्तर देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, तुम्ही कुणाच्याही समर्थनार्थ घोषणा देऊ शकतात, पण तुमच्या मुलांसाठी मी शाळा बांधणार आणि मोफत वीज देणार. मोदी समर्थक घोषणा देणाऱ्यांवर आम आदमी पार्टी (आप) एक दिवस नक्की विजय मिळवेल. तुम्ही कितीही नारे लावले तरी केजरीवालच तुम्हाला मोफत वीज देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल पुढे म्हणाले की, आमचे कोणाशीही वैर नाही. तुम्हाला पाहिजे त्या समर्थनार्थ तुम्ही घोषणा देऊ शकता. एक दिवस आम्ही तुमचे मन जिंकून तुम्हाला आमच्या पार्टीत आणू. राज्यात मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नोकऱ्यांची ‘गॅरंटी’ आणि नोकरी शोधणाऱ्यांना ३ हजार रुपयांचा बेरोजगारी भत्ता देण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
जनतेला संबोधित करताना त्यांनी असा दावा केला की, राज्यात शाळांबाबत बोलणारा पक्ष नाही. शाळा, रुग्णालये बांधून नोकऱ्या आणि मोफत वीज देण्याचे आश्वासन कोणत्याही पक्षाने दिले होते का? आमचा पक्षच या मुद्द्यांवर बोलतो. केजरीवाल म्हणाले की जर लोक गुंडगिरीवर विश्वास ठेवतात आणि शिवीगाळ करत असतील तर ते भारतीय जनता पक्षाला (भाजप) पाठिंबा देऊ शकतात.
केजरीवाल म्हणाले की, शाळा बांधायची असेल तर माझ्याकडे या. मी अभियंता आहे वीज हवी असेल, हॉस्पिटल पाहिजे असेल, रस्ता हवा असेल तर माझ्याकडे या. नाहीतर गुंडगिरी करायला त्यांच्याकडे जा. मी पाच वर्षांच्या मागणीसाठी येथे आलो आहे. तुम्ही त्याला २७ वर्षे दिली, मला पाच वर्षे द्या. जर मी देऊ शकलो नाही, तर मी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) गुजरातमधील सर्व १८२ जागांवर पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. पक्षाने सत्ताधारी भाजपचे प्रमुख दावेदार म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले असून अरविंद केजरीवाल, भगवंत मान, मनीष सिसोदिया हे आप उमेदवारांसाठी आक्रमक प्रचार करत आहेत.
जो Modi-Modi के नारे लगा रहे हैं..
▪️तुम्हारे बच्चों के लिए School तो केजरीवाल ही बनाएगा
▪️अस्पताल तो केजरीवाल ही बनाएगा
▪️बिजली मुफ़्त तो केजरीवाल ही करेगाहमें किसी से कोई दुश्मनी नहीं, एक दिन इनका भी दिल जीत कर AAP में लेकर आएंगे ❤️
—CM @ArvindKejriwal #BadlaavNoAavyoVakhat pic.twitter.com/QGP7jOzhHO
— AAP (@AamAadmiParty) November 20, 2022
AAP Arvind Kejriwal Road Show Modi Slogan
Politics Gujrat Election