नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी राज्यातील सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा दणका दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आपला तब्बल १६४ कोटी रुपये येत्या १० दिवसात भरण्याची नोटिस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानीत ऐन थंडीमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
2015-2016 दरम्यान सरकारी जाहिरातींच्या वेषात प्रसिद्ध झालेल्या राजकीय जाहिरातींसाठी आपकडून 97 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्यासाठी एक महिन्यानंतर नोटीस पाठवली आहे. मात्र यामध्ये ही रक्कम वाढवून 164 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यात या रकमेवरील व्याजाचाही समावेश आहे. माहिती आणि प्रचार संचालनालयाने (DIP) आम आदमी पार्टीला 164 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस जारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम 10 दिवसांत भरण्यास सांगण्यात आले आहे.
खरेतर, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी 2015-2016 दरम्यान सरकारी जाहिरातींच्या वेशात प्रसिद्ध झालेल्या राजकीय जाहिरातींसाठी ‘आप’कडून 97 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले होते. एक महिन्यानंतर नोटीस पाठवली आहे. मात्र यामध्ये ही रक्कम वाढवून 164 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यात या रकमेवरील व्याजाचाही समावेश आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या मुदतीत रक्कम भरली नाही तर तुमची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, या नोटिशीला आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
https://twitter.com/ANI/status/1613370561937420289?s=20&t=u0FfFCvrxf39SSr5AJZbWQ
Aam Adami Party 164 Crore Rs Recovery Notice Delhi
AAP Arvind Kejriwal LG V K Saxena Advertisement Publicity Politics