पुणे – आधार कार्ड हे आता भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. अनेक ठिकाणी ते सक्तीचे आहे. त्यामुळे त्याची गरज कुठे ना कुठे भेसतेच. मात्र, या आधार कार्डमध्ये काही बदल करणे आवश्यक असते. जसे मोबाईल नंबर जोडणे, पत्ता बदलणे, जन्म तारखेतील बदल, नाव किंवा आडनावातील बदल, बायोमेट्रिक अपडेट करणे, नवीन आधार कार्ड काढणे अशा विविध प्रकारच्या सेवा असतात. त्यातील कुठल्या ना कुठल्या सेवेशी आपली गाठ पडतेच. मात्र, आधार सेवा केंद्रात गेल्यानंतर अव्वाच्या सव्वा रक्कम यासाठी मागितली जाते. नक्की किती दर आहेत हे अनेकांना माहित नसते. शिवाय यासंबंधीची तक्रार कुठे करायची हे ही अनेकांना ठाऊक नसते. त्यामुळे खालील माहिती काळजीपूर्वक वाचा, सेवेसाठी तेवढेच पैसे द्या आणि जर कुणी अधिक पैसे आकारत असेल तर त्याची थेट हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.