मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तुम्ही निवृत्ती वेतनधारक आहात? मग हे वाचाच…

by India Darpan
जुलै 10, 2021 | 5:34 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
ऑनलाइन व्यवहाराबाबत अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेकांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असते. साधारण पन्नाशीच्यावर असलेल्या लोकांकडून बहुतांश फसवणुकीच्या तक्रारी येतात. त्यात निवृत्तिवेतनधारकांचाही समावेश आहे. तुमच्या घरात कोणी निवृत्तिवेतनधारक असतील तर त्यांना त्वरित सतर्क करावे. उत्तर प्रदेश पोलिसांनी तसा अलर्ट जारी केला आहे, सायबर गुन्हेगारांनी निवृत्तिवेतनधारकांची फसवणूक करण्याच्या नव्या पद्धती शोधून काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कसे ओढतात जाळ्यात
सायबर गुन्हेगार इतके चलाख असतात की ते निवृत्तिवेतनधारकांची सर्व माहिती घेऊन ठेवतात आणि निवृत्तिवेतनधारकांना फोन करून डिजिटल हयातनामा बनवण्याची बतावणी करतात.
फसवणुकीची पद्धत
सायबर गुन्हेगार निवृत्तिवेतनधारकांकडून देयकाच्या रकमेची संख्या (PPO), आधारकार्ड संख्या, राहण्याचा पत्ता, ईमेल आयडी, निवृत्तिवेतनानंतर मिळालेली रक्कम, मासिक निवृत्तिवेतन, नामनिर्देशित व्यक्ती आदीबाबत माहिती सांगतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार कोषागार (ट्रेजरी) किंवा निवृत्तिवेतन संचालनालयातून बोलत असल्याचे निवृत्तिवेतनधारकांना पटते.
ओटीपीचा खेळ
पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगारांनी निवृत्ती वेतनधारकांचा विश्वास संपादन केल्यानंतर डिजिटल हयातनामा अपडेट करण्यास सांगतात. त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल असे सांगतात. त्यानंतर ते ओटीपी मागून निवृत्तिवेतनधारकांचे बँक खातेच ताब्यात घेतात.ओटीपी मिळाल्यानंतर सायबर गुन्हेगार बँक खाते साफ करून टाकतात. खात्यातील रक्कम दुसर्या बनावट खात्यात किंवा मोबाईल वॉलेटमध्ये स्थलांतरित करतात.
कशी करावी सुटका
निवृत्तिवेतन संचालनालयाने याबाबत संबंधितांना सतर्क केले आहे. निवृत्तिवेतनधारकांना हयातनामा डिजिटल करण्यासाठी निवृत्तिवेतन संचालनालय कधीही  फोन करत नाही. किंवा ऑनलाइनही अपडेट करत नाही, अशी माहिती संचालनालयाकडून देण्यात आली आहे. आपला हयातनामा स्वतः येऊन विभागात सुपूर्द करावा, हे निवृत्तिवेतनधारकांचे कर्तव्य आहे. तसेच अशा फसवणूक करणार्या कॉलपासून सावध राहावे. असे घडलेच तर तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयकर पद्धतीत झाले हे बदल; लक्षात ठेवा, नाही तर पडेल महागात

Next Post

आधार कार्डमधील बदलासाठी नक्की किती पैसे मोजावे लागतात?

Next Post

आधार कार्डमधील बदलासाठी नक्की किती पैसे मोजावे लागतात?

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011