बापरे! केवळ नशिब बलवत्तर म्हणून वाचली ही महिला (बघा हा व्हिडिओ)

मुंबई – केवळ नशिब बलवत्तर म्हणून एखादी व्यक्ती वाचते असे आपण नेहमी ऐकतो. पण, जेव्हा प्रत्यय येतो तेव्हाच आपला या वाक्यावरील विश्वास दृढ होतो. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईकरांना अतिशय कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. याच चक्रीवादळामुळे ठिकठिकाणी झाडे आणि वीजेचे खांब कोसळले. चक्रीवादळामुळे जोरदार वारा आणि अतिवृष्टी मुंबईत दिवसभर सुरू होती. याचवेळी एक महिला रस्त्याने जात होती. त्याचक्षणी रस्त्यालगतचे एक झाड कोसळले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. ही महिला अतिशय बालंबाल बचावल्याचे यात पहायला मिळत आहे.
बघा हा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ