व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुंबई विमानतळावर १५ कोटी किंमत असलेलेल अंमली पदार्थांचे पार्सल जप्त

India Darpan by India Darpan
October 24, 2022 | 11:37 am
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत आहे, अशी टीप मिळाल्याच्या आधारावर, मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या एअर कार्गो संकुलातून, अमली पदार्थांचं एक पार्सल जप्त केले. पॅरिसहून आलेलं हे पार्सल, नालासोपाऱ्याला पोहोचवलं जाणार होतं. या पार्सलची सखोल तपासणी केल्यानंतर, त्यातून, १.९ किलो ऍम्फेटामाइन प्रकारातील पदार्थ (ऍम्फेटामाइन टाईप सबस्टन्स-एटीएस)च्या गोळ्या आढळल्या. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय तस्करी बाजारात, १५ कोटी रुपये इतकी किंमत आहे. या गोळ्या कोरुगेटेड(वळया असलेल्या) पॅकेजिंग सामग्रीच्या आत एका पॉलिथीन पिशवीत लपवून आणल्या गेल्या होत्या.

संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आणि नियोजनबद्ध आखणी करत, हे पार्सल एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे कसे गुप्तपणे पोहचवले गेले, याचा छडा लावला. जेव्हा हे पार्सल संबंधित व्यक्तिपर्यंत पोहोचवले जाणार होते, त्यावेळी, या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या मार्फत, या तस्करीत सामील असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं. या दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, हे पार्सल एका नायजेरियन व्यक्तीला दिलं जाणार होतं. ही माहिती मिळाल्यावर अधिकाऱ्यांनी सापळा रचून, पार्सल घेण्यासाठी आलेल्या नायजेरियन व्यक्तीलाही ताब्यात घेतलं, अशाप्रकारे, या तस्करीप्रकरणी, पोलिसांनी आतापर्यंत तीन व्यक्तींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


Previous Post

पार्सलद्वारे अंमली पदार्थांची तस्करी; तब्बल १५ कोटींच्या गोळ्या जप्त

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी (व्हिडिओ)

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारगिलमध्ये जवानांसोबत दिवाळी (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉलच्या अजिंक्यपद आणि निवड चाचणीचे या तारखेला आयोजन

November 28, 2023

आता पाऊस व गारपीटीची शक्यता किती ? बघा हवामानतज्ञ काय सांगतात…

November 28, 2023

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी या तारखेला परीक्षा

November 28, 2023

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे..छगन भुजबळ

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.