चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करीत बसला कवेत घेतले. यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील ३५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला.