इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पूर्वीच्या काळी राजे-महाराजे यांना एकापेक्षा अनेक बायका असून काही महाराजांना 25 ते 50 बायका असल्याचाही इतिहासात दाखला मिळतो. परंतु अलीकडच्या काळात एक पत्नी सांभाळणे देखील शक्य नसते, असे म्हटले जाते. त्यातच मूळचा ब्राझीलचा असलेला आर्थर हा व्यक्ती चर्चेत आला आहे कारण, त्याला एक-दोन नाही तर तब्बल नऊ बायका आहेत. प्रत्येक पत्नीबरोबर रोमान्स करता यावा यासाठी या बहाद्दराने चक्क एक रोस्टरच तयार केला आहे.
याबाबत स्वत: आर्थरने सांगितले आहे की, मी रोमान्सचे एक वेळापत्रक तयार केले आहे, जेणेकरून मी सर्व पत्नींना वेळ देऊ शकेल. आणि कोणीही त्याविषयी तक्रार करू शकणार नाही. सोशल मीडियावर अनेकांनी आर्थरच्या या रोस्टरला ‘सेक्स शेड्यूल’ असे म्हटले आहे.
वास्तविक, ब्राझीलचा रहिवासी आर्थर ओउर्सो गेल्या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्याने नऊ महिलांशी एकत्र लग्न केले. ‘प्रेमाच्या आणि स्वातंत्र्याच्या’ समर्थनार्थ तसेच ‘एकच लग्न करण्याच्या प्रथेला विरोध’ म्हणून त्याने असे केले. आर्थरसाठी सर्व पत्नींना समान प्रेम देणे हे सोपे नव्हते, म्हणून त्याने रोस्टर बनविण्याचा निर्णय घेतला. त्याची ही बाब सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.
आर्थरने सांगितले की, पूर्वी अनेक पत्नींपैकी एकावर लक्ष केंद्रित करणे त्याच्यासाठी खूप कठीण होते. अनेकदा जेव्हा तो त्याच्या पत्नींपैकी एकासोबत असे, तेव्हा तो दुसऱ्याचा विचार करत असे. परंतु आता आमची सेक्स लाईफ खूप चांगली आहे. मी सुरुवातीला सेक्ससाठी शेड्यूल बनवले पण ते पाळताना अनेक समस्या आल्या. आता सर्व काही सुरळीत झाले आहे. आणि सर्व पत्नी खुष असल्याचे आर्थरचे म्हणणे आहे.