इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वन्यप्राणी असलेल्या माकडाला शोधण्यासाठी पोलिस वणवण भटकत आहेत, असे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का. बरं, हे माकड अतिशय मौल्यवान असेल असेही कुणी सांगितले तर तु्हाला ते पटेल का. पण, हे सारे खरे आहे. पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रकचा अपघात झाल्यानंतर त्यातील १०० पैकी ४ माकडे पळून गेली. या माकडांना मॉरिशसमधून संशोधनासाठी आणण्यात आले होते. यानंतर तीन माकडांना पकडण्यात आले, पण एक माकडाच्या शोधात अजूनही पोलिस फिरत आहेत.
पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या दोन दिवसांपासून काही माकडांमुळे पोलिसांचे हातपाय सुजले आहेत. वास्तविक, ही सामान्य माकडे नाहीत, तर लांब शेपटी असलेली मैकाक माकडे आहेत. त्यांना मॉरिशसहून अमेरिकेत संशोधनासाठी आणण्यात आले होते. सुमारे शंभर माकडांना न्यूयॉर्कहून पेनसिल्व्हेनियातील वैद्यकीय प्रयोगशाळेत ट्रकने नेले जात होते. त्याचवेळी या ट्रकचा पेनसिल्व्हेनियामधील डॅनविले येथे अपघात झाला, त्यानंतर ट्रकमधील चार माकडे पळून गेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही त्यांचा शोध सुरू केला. त्यांच्या शोधासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आणि अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी तीन माकडांना पकडले. दरम्यान, या घटनेत तीन माकडांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अजूनही एक माकड सापडले नसून, त्याला शोधणे पोलिसांसाठी डोकेदुखी बनले आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे की, जर कोणाला हे माकड दिसले तर लगेच पोलिसांना कळवा आणि त्याच्याकडे जाण्याची चूक करू नका. या माकडाचा माग काढण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर व्यतिरिक्त थर्मल कॅमेऱ्यांचाही वापर केला आहे, असे स्थानिक वेब मीडियाच्या अहवालात म्हटले आहे. तसेच पोलिसांनी अतिशय तेजस्वी टॉर्चचा वापर करुन या माकडाचा शोध घेणे सुरू केले आहे.
पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी हरवलेल्या माकडाचा फोटोदेखील ट्विट केला आहे. हे माकड एका झाडावर बसल्याचे आढळून आले होते. मात्र, त्याला पकडता आळेले नाही. या माकडाचा अद्याप कोणताही मागमूस सापडला नसल्याचे पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच कोणीही पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. हे माकड किंमतीच्या बाबतीतही खूप मौल्यवान आहे. एका माकडाची किंमत साडेसात लाख रुपयांपर्यंत असू शकते. जगभरातील कोरोना महामारीत संशोधन आणि संशोधनासाठी त्यांची मागणी जगभरात झपाट्याने वाढली आहे. या जातीची माकडे बंदिवासात तीस वर्षांपर्यंत जगू शकतात.